Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यातील या कारखान्याच्या  कामगारांचे आजपासून उपोषण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगारांची सहनशीलता संपल्याने अखेर संपाचे हत्यार उपसले असून आता आरपारचा लढा पुकारला आहे. आज सोमवार दि.23 पासून कामगार आपल्या न्यायहक्कासाठी कारखाना कार्यस्थळावर उपोषणाला बसणार आहेत.

कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील दि.1 ऑगस्ट 2017 ते 31 ऑगस्ट 2021 अखेर थकित वेतन , वेतन आयोगाचा थकित फरक, भविष्य निर्वाह निधी , उपदान निधी, रिटेंशन अलाऊन्सची थकबाकी यासाठी कामगारांनी उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कामगारांनी दहा दिवसांपूर्वी तहसीलदार फसियोद्दीन शेख, सहाय्यक कामगार आयुक्त, कारखाना व पोलीस प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली. उपोषणाला बसणार्‍या कामगारांनी राहुरी येथे शनी मंदिरात थकित रकमा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर ठाम असल्याचे सांगितले.

सहाय्यक कामगार आयुक्त नगर, कारखाना व्यवस्थापन व कामगारांची बुधवार ता. 18 व पुन्हा शनिवारी बैठक झाली. परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही. कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे व संचालक मंडळाने कामगारांशी चर्चा करून आंदोलनापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.

परंतु तोही फोल ठरला. कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सीताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे यांनी उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!