Friday, January 21, 2022

ना.गडाखांच्या प्रयत्नाने होत असलेल्या देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड रस्त्याचे कामाचा भास्करगिरी महाराजांचे शुभारंभ

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील देवगड फाटा ते श्री क्षेत्र देवगड ५ कि.मी. अंतराच्या ५ कोटीच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

ना.गडाख यांनी गेल्या वर्षीच्या राज्याच्या बजेट मध्ये नेवासा तालुक्यातील रस्त्यासाठी १०० कोटी रुपये मंजूर करून आणणे होते. त्यातील पहिल्या टप्प्यात या ५ कोटीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन उदघाटन आज दि.२३ ऑगस्ट रोजी गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी ना.गडाख यांनी,देवगड फाटा ते श्रीक्षेत्र देवगड हा माझ्या घरचा रस्ता असून शासकीय अधिकारी यांनी आदरणीय महाराजांच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखाली व्यवस्थित लक्ष घालून पूर्ण करावा अशाही सूचना यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच नेवासा तालुक्यासाठी जवळपास ३०० ते ३५० किमी रस्त्याचे कामांचा प्लॅन तयार केला असून येणाऱ्या काळात शासन स्तरावरून मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे ही ना.गडाख म्हणाले.

यावेळी ह.भ.प.रामनाथ महाराज पवार,मुळा कारखाना चेअरमन नानासाहेब तुवर, व्हा.चेअरमन कडूनाना कर्डिले, पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे,उपसभापती किशोर जोजार, जिल्हा परिषद सदस्य पिंटू शेळके, मुळा कारखाना माजी व्हा.चेअरमन भाऊसाहेब मोटे, शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र म्हस्के,मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील,कैलास झगरे, प.स.सदस्य रवि शेरकर प.स.सदस्य,हरिभाऊ शेळके,बजरंग विधाटे,डाॅ.अशोकराव ढगे, अॅड.अण्णासाहेब अंबाडे,अॅड.काका गायके,प्रभाकर कोलते,श्रीरंग हारदे, कार्यकारी अभियंता श्री.चव्हाण,सहाय्यक कार्यकारी अभियंता कोकरे, शाखा अभियंता खामकर व परिसरातील सरपंच,उपसरपंच सोसायटीचे चेअरमन,व्हाईस चेअरमन,सदस्य,ग्रामस्थ उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!