Thursday, January 20, 2022

राज्याला मोठा दिलासा! दिवसाच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट;जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आज मोठा दिलासा मिळाला आहे. कारण दिवसभरात कोरोनाची नवी रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली गेली आहे. तसेच सक्रीय रुग्णांच्या संख्येतही काहीशी घट झाली असून मृतांचा आकडाही घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून चार ते सहा हजारांदरम्यान राहणाऱ्या या दररोजच्या संख्येत मोठी घट झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात दिवसभरात 3,643 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 64,28,294 झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.05 टक्के झालं आहे. तसेच राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या काहीशी कमी होऊन 49,924 इतकी झाली.

मृतांचा आकडा ही कमी होऊन आज 105 पर्यंत खाली आला आहे. दिवसभरात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. आज 3,643 नवे रुग्ण सापडले तर 6,795 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 62,38,794 इतकी आहे. राज्यात आज १०५ कोरोनाचे मृत्यूराज्यात मृत्यूचा आज 105  रुग्ण दगावले.

नागपूर, अकोला मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर पुणे मंडळात आज सर्वाधिक मृत्यू झाले असून तेथे 59 मृत्यूची नोंद झाली. ठाणे 8, नाशिक 13, कोल्हापूर 14, औरंगाबाद 2, लातूर 9 मृत्यू नोंदवले गेले. राज्यातील मृत्यूदर 2.11 टक्के इतका आहे. तर मृतांचा एकूण आकडा 1,36,067 वर पोहोचला आहे.

सुमारे अडीज हजार रुग्ण संस्थात्मक क्वारंटाइनआजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5,24,45,689 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,28,294 (12.26 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,02,888 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 2,487 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!