माय महाराष्ट्र न्यूज:भेंडा येथील श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात कवी कुसुमाग्रज निमित्त जयंती व्याख्यान व पुस्तक प्रकाशनाने मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला.
मराठी भाषा आपली राजभाषा आहे .व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर अभिमानपूर्वक करावा असे आवाहन शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी केले.भेंडा येथील जिजामाता शास्र व कला
महाविद्यालयात सोमवार दि.२७ फेब्रुवारी रोजी आयोजित कार्यक्रमात “मराठी भाषेतील रोजगाराच्या संधी” या विषयावरपत्रकार अशोक निंबाळकर यांचे व्याख्यान झाले.यावेळी शिक्षक डॉ. राजेंद्र गवळी
लिखित मराठी आत्मकथनांतील पारधी समाजजीवन (समीक्षा ग्रंथ) व मृदगंध (कवितासंग्रह) या दोन पुस्तकांचे प्रकाशन श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे हस्ते
करण्यात आले.शिक्षण संस्थेचे विश्वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.यावेळी शिक्षण संस्थेचे विश्वस्त अड. देसाई देशमुख, डॉ. नारायण म्हस्के, प्रा.डॉ. हंसराज जाधव,
शिक्षण संस्थेचे प्रशासकिय अधिकारी भारत वाबळे,प्राचार्य डॉ.रामकिसन सासवडे, उपप्राचार्य डॉ. रमेश नवल,उपप्राचार्य डॉ.संभाजी काळे,प्रा.डॉ. शिरीष लांडगे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय दरवडे,प्रा. मकरंद बारगजे आदि उपस्थित होते.
माजी आमदार पांडूरंग अभंग म्हणाले, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी अनमोल विचार ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी ‘ माध्यमातून आपल्या पर्यंत मराठी भाषेच्या आधारे मांडले .जीवनात चांगल्या गुणांचा स्वीकार करत भाषेच्या
माध्यमातून जीवनात उत्कर्ष करावा.डॉ.शिरीष लांडगे यांनी प्रास्ताविक डॉ.काकासाहेब लांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.मिना पोकळे यांनी आभार मानले.