Thursday, January 20, 2022

नगर जिल्ह्यातील या माजी मंत्र्यांचा सवाल मंत्री राणेंना जो न्याय तो मुख्यमंत्री ठाकरेंच्या बाबतीत पोलीस लावणार का? 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:‘मी असतो तर मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात वाजवली असती’, असे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. राणे यांच्या वक्त्यव्याचे समर्थन करता येणार नाही, मात्र व्यक्ती म्हणून त्यांच्याशी पाठीशी राहू अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्या एका विधानाची आठवण करून दिली आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करून राणेंना एक न्याय व मुख्यंत्र्यांना दुसरा असे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

शिंदे यांनी म्हटले आहे, ‘एक ऑगस्ट २०२१ रोजी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले होते, “अशी एक झापड देऊ की, पुन्हा कधी उठणारच नाही.” मग जो न्याय केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना तोच न्याय मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बाबतीत

महाराष्ट्र पोलीस लावणार का? हे राज्य खरच कायद्याचे आहे का? असेल तर पोलीस प्रशासन समान न्याय करेल काय? हीच अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम जनतेची आहे,’ असे शिंदे यांनी म्हटले आहे.बीडीडी चाळीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी प्रसाद लाड यांचे नाव न घेता स्वत: ठाकरे यांनी त्यांना हे उत्तर दिले होते. ‘

आम्हाला कोणी थपडा मारण्याच्या धमक्या देऊ नयेत, नाहीतर अशी एक झापड देऊ की धमक्या देणारे पुन्हा कधी उठणार नाहीत,’ असे ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या तोंडी अशी भाषा शोभत नसल्याची टीका त्यावेळीही भाजपच्या नेत्यांनी केली होती. आता राणे यांना अशाच वक्तव्यासंबंधी अटकेला सामोरे

जाण्याची वेळ आल्याने प्रा. शिंदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानाची आठवण करून देत पोलिसांवर टीका केली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!