Tuesday, January 18, 2022

राधाकृष्ण विखेंनी घेतला राज्यसरकाराचा खरपूस समाचार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूर तालुक्यातील विविध गावांमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन संवाद साधला. गावपातळीवरचे प्रश्न जाणून घेत त्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याबाबत कार्यकर्त्यांना दिलासा दिला.

जि. प. सदस्य शरदराव नवले यांच्या वस्तीवर झालेल्या बैठकीत आ.विखे पाटील संकटामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा आढावा घेऊन महाविकास आघाडी सरकार कसे अपयशी ठरले याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले.

सरकारकडे कोणतीच इच्छाशक्ती नसल्याने राज्य अधोगतीकडे चालले आहे. निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने महाविकास आघाडी सरकार सर्वच परीक्षांमध्ये नापास झाले असल्याची टिका भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. नैराश्य झटकून नव्या विचाराने एकत्रित येवून काम सुरू करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

सरकारमध्ये थोडीही इच्छाशक्ती नसल्याने कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत. घेतलेले निर्णय मागे घेण्याची वेळ मंत्र्यांवर येते. सरकारच्या अनास्थेमुळे सर्वाधिक नुकसान शिक्षण क्षेत्राचे झाले. शिक्षण विभागाने टॅब उपलब्ध करून दिले असते तरी मुलांना शिक्षण घेता आले असते. पण सरकारला काहीच करायचे नसल्याची टीका केली.

आगामी काळात रोजगार निर्मितीचे मोठे आव्हान सर्वाच्या समोर आहे. युवकांनी स्टार्ट अपमध्ये अधिक लक्ष ठेवून उद्योगांची माहिती जाणून घेत आपल्या भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन आ.विखे यांनी केले.

आगामी काळात सर्वांना एकत्रित राहून काही निर्णय करावे लागणार आहेत त्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी प्रयत्न करण्याचे सुतोवाच त्यांनी केले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!