Thursday, January 20, 2022

नगरमध्ये चित्रा वाघ यांचा सवाल कायदे-नियम फक्त भाजपलाच का; हीच का तुमची शिवशाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आघाडी सरकारवर टीका केली आहे.काल मंगळवारी चित्रा वाघ यांनी पारनेर मधे सध्या चर्चेत असलेल्या तहसीलदार ज्योती देवरे यांची त्यांनी भेट घेतली व त्यांना धीर दिला.

त्यानंतर अहमदनगर मध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राणे, देवरे याविषयीवर पत्रकारांच्या प्रशांना उत्तरे दिली. यावेळी बोलताना पुण्यात मंत्र्यांवर एफआयआर दाखल होतो पण कारवाई होत नाही, औरंगाबाद मध्ये राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकार्यांला क्लिनचिट मिळते, ज्योती देवरे प्रकरणात राष्ट्रवादीचा आमदार म्हणून कारवाई टाळली जाते,

पण दुसरी कडे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर एका वक्तव्यावर अटक केली जाते. म्हणजे भारतीय जनता पक्षाला कायदे आणि नियम आहेत आणि राज्यातील सरकारमधील मंत्री, पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय आहे, हीच का तुमची शिवशाही असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

आज चित्रा वाघ यांनी पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची भेट घेत या प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी भाजपचे सुजित झावरे हे त्यांच्या सोबत उपस्थित होते. याचाच आधार घेत वाघ यांनी झावरे आणि देवरे यांच्यात मध्यंतरी झालेला वाद आणि दाखल गुन्ह्यांचा संदर्भ देत भाजपची संस्कृती ही वेगळी आहे.

झावरे आणि देवरे यांच्यात वाद असले तरी भाजपची संस्कृती म्हणून ते देवरे यांच्या पाठीशी उभे आहेत असे सांगितले. भारतीय जनता पक्ष ज्योती देवरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि राहील अशी ग्वाही चित्रा वाघ यांनी यावेळी दिली. यावेळी प्रदेश पदाधिकारी प्रा.भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!