Thursday, January 20, 2022

राज्यात नवा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न: विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्यात नवा राजकीय दहशतवाद निर्माण करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे.गृह विभागातील राजकीय हस्तक्षेप फक्त अधिकार्यांना पाठीशी घालण्यासाठी होत असून, या विभागात अजून किती वाझे शिल्लक आहेत हे शोधण्‍याची वेळ आता आली आहे असा परखड इशारा भाजपा नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सूडबुध्दीने केलेल्या अटकेचा निषेध करण्यासाठी आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील प्रांतकार्यालया समोर भारतीय जनता पक्षाच्या वतीने निदर्शन करून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर ,नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलास कोते, तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, किसान मोर्चाचे अध्‍यक्ष बाबासाहेब डांगे, ओबीसी आघाडीचे बाळासाहेब गाडेकर, युवा मोर्चाचे अध्‍यक्ष सतिष बावके, चेअरमन मुकूंदराव सदाफळ, सभापती भाऊसाहेब जेजूरकर, उपसभापती बाळासाहेब जपे, सचिन शिंदे यांच्‍यासह नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

आ.विखे पाटील यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर सडकून टिका केली.विसरभोळेपणा असलेल्या मुख्यमंत्र्यांना स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव आहे की हिरकमहोत्सव हे समजू नये याचे आश्चर्य वाटते.त्यांच्या या कृतींमुळे देशाबरोबर स्वातंत्र्य सैनिकांचा सुध्दा अपमान झाला असल्याचा निषेध आ.विखे यांनी केला.

मंत्री राणे यांना झालेली अटक करून आम्ही पाहीजे तसे काही करु शकतो या सरकारच्या मनमानी कारभाराला न्यायालयाने चपराक दिली असल्याचे स्पष्ट करून आ.विखे पाटील म्हणाले की,मागील दोन वर्षापासून या सरकारचा फक्त गृहविभाग चर्चेत आहे.अधिकार्यांना हाताशी धरून सामान्य माणसांवर दहशत निर्माण करण्यासाठी या विभागात अजून किती वाजे शिल्लक आहेत हे शोधण्याची वेळ आली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

नासिकच्या पोलीस आयुक्तांनी ज्या पध्दतीने अटकेची कार्यवाही केली ते पाहाता आधिकारीही आता राज्‍यकर्त्‍यांच्‍या दबावात काम करु लागले आहेत. नियमांच्‍या बाहेर जावून केलेल्‍या या कृतीबद्दल आयुक्‍तांना तातडीने निलंबित करावे अशी मागणी करुन, आ.विखे पाटील म्‍हणाले की, यापूर्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी बद्दल खालल्‍या पातळीवर जावून वक्‍तव्‍य केली.

परंतू तुमच्‍यावर कोणी गुन्‍हे दाखल केले नाहीत परंतू आता तुमच्‍याकडून झालेली टिका आणि दसरा मेळाव्‍यातील भाषणाच्‍या जुन्‍या रेकॉर्ड काढुन कारवाई करण्‍याची मागणी आम्‍हाला करावीच लागेल असा इशारा आ.विखे पाटील यांनी यावेळी दिला.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना याप्रसंगी निवेदन देण्‍यात आले. यामध्‍ये राणे यांना झालेल्‍या अटकेची चौकशी करुन,संबधितांवर कारवाई करावी. सुडबुध्‍दीने दाखल केलेले गुन्‍हे तातडीने मागे घ्‍यावेत, राज्‍यातील भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांवर आणि कार्यालयांवर हल्‍ले करणा-या व्‍यक्तिंवर गुन्‍हे दाखल करावेत अशा मागण्‍या करण्‍यात आल्‍या आहेत.

जिल्‍हाध्‍यक्ष राजेंद्र गोंदकर, नगराध्‍यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपाचे उपाध्‍यक्ष अॅड.रघुनाथ बोठे यांचीही यावेळी भाषणे झाली. महाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्‍यात आली.

विधान परिषदेचे उपसभापती पद हे घटनात्‍मक आहे. तरीही त्‍या पदावर विराजमान असलेल्‍या शिवसेनेच्‍या नेत्‍या राजकीय वक्‍तव्‍य करीत आहेत. त्‍यांनी प्रथम आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा नाहीतर आम्‍हाला यासाठी न्‍यायालयीन लढाई लढावी लागेल असा इशाराही आ.विखे पाटील यांनी दिला.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!