Thursday, January 20, 2022

राजेंद्र नागवडे यांना कारखाना चालविण्याचे ज्ञान नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :नागवडे’ सहकारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी परभणी व कराड येथे स्वतःचे दोन खासगी कारखाने काढले असून बहुतांश त्यांचा वेळ खाजगी कारखान्याकडे असल्याने सभासद व कामगारांना रस्त्यावर येण्याची वेळ आणली आहे.

बापूंना कारखाना चालविण्याचे संपूर्ण कसब होते, मात्र त्यांच्या चिरंजीवांना सहकारी कारखाना चालवण्याचे ज्ञान नसल्याची घणाघाती टीका नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशवभाऊ मगर यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी मगर बोलताना म्हणाले की नागवडे हे आमची दिलजमाई झाल्याचे सांगत असले तरी या गोष्टीत अजिबात तथ्य नाही. सभासद, शेतकरी व कामगारांचे आम्ही प्रपंच मोडू देणार नाही. बापू, खासेराव वाबळे, शिवराम अण्णा, रंगनाथ पंधरकर, संपतराव जामदार यांनी शेतकऱ्यांचे शेअर्स गोळा करून तालुक्याची कामधेनू उभारून कारखाना उभारला.

त्यांच्या तत्वांचा वारसा पुढे चालू राहण्यासाठी ही निवडणूक कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढवणारच असे मगर यांनी स्पष्ट केले. तसेच २०१९-२० मध्ये ऊस शिल्लक असतानाही नागवडे यांनी कारखाना बंद ठेवून २८ ते ३० कोटींचे नुकसान केले. कारखाना बंद असताना कामगारांना अर्धा पगार देऊन काम मात्र स्वतःच्या खासगी कारखान्यात करायला लावले.

डिस्टलरी, रॉ शुगर, कोजन प्रकल्प, सभासद साखर विक्री या गोष्टी व अनेक नियमबाह्य कामे करून कारखान्याला कोट्यावधी रुपयांचा दंड व कोट्यावधी रुपयांचा कर्जाचा डोंगर उभा करून कारखाना अडचणीत आणण्याचे काम केले असल्याचा आरोप करून पक्षविरहीत आघाडी स्थापन करून नागवडे कारखाना निवडणूक लढण्याचा निर्धार मगर यांनी व्यक्त केला.

यावेळी मागील काही दिवसांपासून श्रीगोंदा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले व राजेंद्र नागवडे यांच्यात जवळीक दिसल्यानंतर पत्रकारांनी भोसले यांना विविध प्रश्न विचारून घेरले. मात्र भोसले यांनी सहकार टिकवण्यासाठी भाऊंसोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले. कारखाना निवडणुकीत

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जरी आदेश दिला तरी आपण मगर यांच्यासोबत पक्षविरहित आघाडीत राहणार असे काँग्रेस तालुकाध्यक्ष भोसले यांनी सांगितले. स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन माझी भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचे भोसले यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, केशव मगर व आण्णासाहेब शेलार यांनी केलेल्या आरोपांवर चेअरमन राजेंद्र नागवडे यांना विचारले असता निवडणुका डोळ्यापुढे ठेवुन सर्व आरोप होत आहेत. सर्व आरोप तथ्यहीन, बिनबुडाचे व पोरकटपणाचे असून निवडणुकीवेळी सर्वांचा बुरखा फाडु.

कारखान्याचे चेअरमन कुणाला करायचे हे सभासद ठरवतील. संचालक झाल्यापासून जे करखान्याकडे फिरकले सुद्धा नाहीत त्यांनी याबाबत विचार करू नये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!