Monday, January 17, 2022

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांचा व देवेंद्र फडणवीसांचा एकत्रीत प्रवास….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे वादाच्या भोवर्‍यात सापडलेले राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी या प्रकरणात देवरे यांच्यावरच डाव उलटवला.

यानंतरही भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट पारनेरला येत ज्योती देवरे यांची भेट घेतली तसेच या ऑडिओ क्लिपनिमित्त महाविकास आघाडी सरकारवर तसेच आ.लंके यांच्यावर निशाणा साधला. आ.लंके यांचे कौतुक करणार्‍या इंदूरीकर महाराज यांनाही वाघ यांनी फटकारले.

मात्र यावेळी सोशल मिडियात आ.लंके व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे एकत्रित विमान प्रवासाचे फोटो व्हायरल झाले आहेत. वर्धा येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी आ.लंके हे मुंबईहून नागपूरला विमानाने चालले असताना फडणवीसही विमानातळावर होते.

आ.लंके यांनी फडणवीस यांच्यासोबत सेल्फीही घेतला. एकीकडे भाजपच्या महिला नेत्या पारनेरमध्ये येवून आ.लंकेंवर आगपाखड करीत असताना भाजपचे महाराष्ट्रातील सर्वेसर्वा फडणवीस हे आ.लंके यांच्यासोबत विमानप्रवास करीत असल्याचे चित्र यानिमित्त समोर आले आहे. या फोटोची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!