Saturday, January 22, 2022

कंडोम नाही म्हणून फेविक्विकचा वापर, शारीरिक संबंध करताना विचित्र प्रयोग करणाऱ्या तरुणाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:एका तरुणाने तरुणीसोबत शरीर संबंध ठेवताना कंडोम नाही म्हणून स्वत:च्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा प्रयोग केला. पण हा प्रयोग त्याच्या अंगाशी आला. फेविक्विकमुळे मल्टिपल ऑर्गन फेलियर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृतक हा ड्रग्जचं देखील सेवन करायचा, अशी देखील माहिती समोर आली आहे.

संबंधित घटना ही अहमदाबाद शहरातील फतेहवाडी परिसरात घडली आहे. मृतक 25 वर्षीय तरुणाला ड्रग्जच्या सेवनाचं व्यसन होतं. तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. दोघांनी ड्रग्जचं सेवन करुन शारीरिक संबंध बनवण्याचा निर्णय घेतला होता. पण ते हॉटेलमध्ये येताना कंडोम विसरले होते.

यावेळी त्यांच्याजवळ फेविक्विक होतं. त्यांच्याकडे फेविक्विक राहण्यामागे एक वेगळं कारण होतं. व्हाईटनरमध्ये असणाऱ्या द्राव्यात मिसळून त्या द्राव्याचं ते ड्रग्स म्हणून सेवन करणार होते. कारण त्याच्याने देखील नशा येते, असा त्यांचा समज होता.गुजरातच्या अहमदाबाद शहरात असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडसोबत शरीर संबंध ठेवण्याआधी सावधानतेचा मार्ग म्हणून कंडोमचा विचार केला. पण त्यावेळी त्यांच्याकडे कंडोम नव्हतं. पण शारीरिक संबंधादरम्यान नको असलेली गर्भधारणा झाली तर? या विचाराने त्याने आपल्या लिंगाला फेविक्विक लावलं होतं. पण त्याचा हा प्रयोग चुकीचा ठरला.

या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी तो शहरातील अंबर टॉवरजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. तो ड्रग्जचं सेवन करत असल्याने तो बेशुद्ध झाला असेल असं त्याच्या आई-वडिलांना वाटलं. पण बराच वेळ झाल्यानंतरही त्याने डोळे उघडले नाहीत तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी त्याला अहमदाबादच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. पण तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तरुणाच्या मृत्यूनंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी रुग्णालयात पोहोचून सगळी माहिती घेतली. त्यानंतर तरुण आधीच्या दिवशी कोणत्या हॉटेलमध्ये गेला होता त्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्या हॉटेलच्या सीसीटीव्हीत तरुण आणि त्याची प्रेयसी दिसत आहेत. हॉटेलच्या सीसीटीव्हीत जे दृश्य दिसत आहेत त्यानुसार हॉटेलमध्ये तरुणासोबत दोन मुली आल्या होत्या.

त्यापैकी एक मुलगी ही लगेच स्कुटी घेऊन निघून जाते. तर दुसऱ्या मुलीसोबत तरुण ही हॉटेलमध्ये एका खोलीत जातो. मेडिकल रिपोर्टनुसार, मृतकाचा मृत्यू हा त्याने प्रायव्हेट पार्टमध्ये फेविक्विक चिपकावल्याने झाला आहे. कारण त्यामुळे त्याचे मल्टीपल ऑर्गन फेलियर झाले आहेत. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!