माय महाराष्ट्र न्यूज:दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनीष शिसोदिया यांना सीबीआयने कुठलेही पुरावे नसताना खोट्या गुन्हात अटक केल्याचे निषेधार्थ नेवासा आम आदमी पार्टी
वतीने तहसील कार्यालय समोर दि.३ मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण करणेत येणार आहे अशी माहिती पक्षाचे नेते ॲड.सादीक शिलेदार यांनी दिली .निवेदनात पक्षाचे वतीने म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री शिसोदिया यांना सुड भावनेने अटक केली .
असून त्यांनी दिल्ली मध्ये अनोखी शिक्षण क्रांती घडवली त्याचा फायदा लाखो गोरगरीब मुलांना होऊन ते जागतिक दर्जाचे शिक्षण घेत आहेत.त्यामुळे पक्षाविषयी सामान्य जनता खुश असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचे मार्गदर्शनाखाली पक्ष देशात जलद
गतीने वाढत आहे. आगामी काळात भाजप ला पर्याय म्हणून मार्गक्रमण करीत आहे.याची धास्ती घेऊन नेत्यांवर खोट्या कारवाया केल्या जात आहे. लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याने देशाचे संविधान धोक्यात आले आहे.मनीष शिसोदिया यांची
अटक ही त्याचीच परिणती आहे. त्याचा निषेध म्हणून पक्षाचे वतीने दि. ३ मार्च २०२३ पासून जो पर्यंत शिसोदिया यांचे वरील गुन्हा मागे घेतले जात नाही तोपर्यंत बेमुदत साखळी उपोषण करणेत येणार आहे.निवेदनावर ॲड.सादीक शिलेदार, राजु अघाव ,संदीप अलावणे,
प्रवीण तिरोडकर,देवराम सरोदे सर,अण्णा लोंढे,किरण भालेराव,सुरेश गायकवाड,बापू अधगले,महेश दगडे, सलीम सय्यद बाळासाहेब साळवे ,भाऊसाहेब बेल्हेकर आदींच्या सह्या आहेत.