Thursday, January 20, 2022

फक्त 1 लाखाच्या भांडवलात महिना 10 लाख रुपये कमवा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कमाई करण्यासाठी चांगल्या व्यवसायाच्या शोधात असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट व्यवसायाची माहिती घेऊन आलो आहोत. छोट्या खोली एवढ्या जागेतही तसेच कमी भांडवलात जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. काही व्यवसाय अगदी लो कॉस्टमध्ये सुरू करता येतात. परंतु जबरजस्त नफा कमाईची क्षमता ठेवतात.

1 लाख रुपयांची गुंतवणूक करून 10 लाखांपर्यंत कमवा
बाजारात जास्त मागणी असलेल्या बटन मशरूमची शेती ऑक्टोबर ते मार्च महिन्याच्या दरम्यान करण्यात येते. मशरूम बनवण्यासाठी गहू किंवा तांदूळाच्या भुशात काही केमिकल मिळवून कंपोस्ट खत तयार करण्यात येते. कंपोस्ट खत तयार होण्यात महिनाभराचा वेळ लागतो.

त्यानंतर एखाद्या चांगल्या जागी 6-8 इंच मोठी परत टाकून मशरूमचे बी लावता येते. ज्याला स्पॉनिंग देखील म्हणतात. बीयांना कंपोस्टने झाकण्यात येते. साधारण 40 ते 50 दिवसात मशरूम बाजारात विकण्याच्या लायकीचा होतो. मशरूमची शेती खुल्यात होत नाही. त्यासाठी शेडसारखी जागा हवी.

मशरूमची शेती 1  लाख रुपयांवरून सुरू करून चांगला नफा कमावता येऊ शकतो. एक किलो मशरूमवर साधारण 25-30 रुपये खर्च येतो.तसेच बाजारात मशरूमची किंमत 250 ते 300 रुपये किलो इतकी असते. मोठ्या शहरातील हॉटेल्समध्ये मशरूमचे सप्लाय केल्याने 500 रुपये प्रति किलोसुद्धा विकले जाऊ शकते. अशातच तुमचा नफा मोठा होऊ शकतो. बाजारात थेट विकल्याने मार्जिनदेखील चांगला मिळतो.

मशरूमच्या शेतीला काळजीपूर्वक करण्याची गरज असते. या व्यवसायात जास्त स्पर्धा नाही.मशरूमच्या शेतीला सर्वात जास्त गरजेचे तापमान असते. त्यासाठी 15-22 डिग्री सेंटीग्रेट तापमानाची गरज असते.जास्त तापमानामुळे पिक खराब होऊ शकते. शेतीसाठी वातावरणातील आद्रता 80-90 टक्के असायला हवी.

चांगल्या मशरूमच्या उत्पादनासाठी कंपोस्ट खताचे असणे देखील गरजेचे असते.शेतीसाठी जास्त जुने बीयाणे घेऊ नका. ताज्या मशरूमची किंमत जास्त असते. तयार झाल्या झाल्या मशरूमच्या विक्रीची व्यवस्था लावा.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!