माय महाराष्ट्र न्यूज:पीरियड्सनंतर पुढील मासिक पाळीच्या पहिल्या ओव्हुलेशनमध्ये प्रेग्नन्सी होऊ शकते. जर मासिक पाळीचे चक्र 28 दिवस
असेल पीरियड्स संपल्यानंतर 10 व्या दिवसापासून ते 17 व्या दिवसापर्यंत, गर्भधारणेसाठी योग्य वेळ मानली जाते. जर एखाद्या महिलेचे मासिक पाळी चक्र 28 दिवसांचे असेल, तर बहुतेकवेळा गर्भधारणा
12 व्या, 13 आणि 14 दिवशी होण्याची शक्यता जास्त असते. परंतु 17 व्या दिवसानंतर, गर्भधारणेची शक्यता कमी होते. यामुळेच ओव्हुलेशनचा दिवस गर्भधारणेसाठी सर्वांत योग्य मानला जातो. ओव्हुलेशनच्या
पहिल्या पाच दिवसांत शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तसंच ज्या दिवशी ओव्हुलेशन होतं, त्या दिवशीही शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा होऊ शकते.स्त्रीचे
पीरियड्स सुरू होताच, ओव्हुलेशनची प्रक्रियादेखील सुरू होते आणि अंडपेशी तिच्या ओव्हरीतून बाहेर येऊ लागतात. त्यानंतर अंडपेशी स्पर्मबरोबर फर्टिलाइज होतात आणि गर्भधारणेची प्रक्रिया सुरू होते. परंतु,
काहीवेळा काही कारणांमुळे अंडपेशी आणि स्पर्मचं मीलन होऊ शकत नाही, ज्यामुळे गर्भधारणा होत नाही.पीरियड्सनंतर किती दिवसांनंतर गर्भधारणा होत नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, पीरियड्स संपल्यानंतर पहिल्या दिवसापासून
पुढील सहा दिवसांपर्यंत गर्भधारणेची शक्यता नसते. परंतु ज्या स्त्रीची मासिक पाळी कमी काळाची असते तिला गर्भधारणा होण्याची अधिक शक्यता असते. कारण त्यांची ओव्हुलेशनची प्रक्रिया फार लवकर होते,
ज्यामुळे लैंगिक संबंधांनंतर सुमारे एक आठवडा स्पर्म त्यांच्या शरीरात टिकून राहतात.काही लोकांना नेहमीच असा प्रश्न पडतो पीरियड्सनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवायला हवेत? बर्याच लोकांचा असा विश्वास आहे की पीरियड्समध्ये
लैंगिक संबंध ठेवल्यास महिला गर्भवती होण्याची शक्यता 100% असते. पण, असं नाही. गर्भधारणेची जास्तीत जास्त संभाव्यता ओव्हुलेशनच्या दिवसात शारीरिक संबंध ठेवल्यास असते. कारण त्या काळात
अंडपेशी फॅलोपियन ट्यूबमध्ये असतात, पण जेव्हा अंडपेशी फॅलोपियन ट्यूबमधून परत जातात तेव्हा गर्भधारणेची शक्यता कमी होते.