Sunday, September 26, 2021

नगरमध्ये रूपाली चाकणकरांचा अमृता फडणवीसांवर निशाणा?यांनी नृत्य केलं तर ती कला पण लोककलावंतानी हे केलं तर ते नाचे

IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
IMG-20210619-WA0049
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पारनेर तालुक्यातील कार्यक्रमातही सडकडून टीका केली. ‘या वक्तव्यावरून विरोधकांचे वैचारिक दारिद्रय लक्षात येते.

त्यांनी एखादं गाणं म्हटलं, नृत्य केलं तर ती कला. मात्र, लोककलावंतानी हे केलं तर ते नाचे, असे यांचे खालच्या पातळीवरील विचार आहेत,’ अशी टीकाही चाकणकर यांनी केली. त्यामुळे दरेकर यांच्यावर टीका करताना चाकणकर यांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची चर्चा आहे.

पारनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चाकणकर बोलत होत्या. यामध्ये त्यांनी लंके यांच्या कार्याचं तोंडभरून कौतुक केलं. पुढील २५ वर्षे लंके येथून विजयी होत राहतील, असं सांगून लंके यांनी यापुढील निवडणुकांत राज्यातील इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी जावं, असं आवाहन केलं. तसंच त्यांना पुणे जिल्ह्यात येण्याचं निमंत्रणही चाकणकर यांनी दिलं आहे.

दरेकर यांनी सोमवारी केलेल्या वक्तव्याचा चाकणकर यांनी समाचार घेतला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसला गरीब लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘रंगलेल्या गालाचा’ मुका घेणारा पक्ष आहे,’ अशी टीका दरेकर यांनी केली होती. चाकणकर यांनी कालच त्यांना उत्तरही दिलं होतं. आज पुन्हा या विषयावर त्यांनी भाष्य केले.

त्या म्हणाल्या, विरोधक ज्या पद्धतीने टीका करत आहेत, त्यावरून त्यांच्या विचारांची पातळी लक्षात येते. त्यांनी एखादं गाणं म्हटलं, नाच केला तर ती कला आणि लोककलावंतांनी नाच केला तर ते नाचे. म्हणजे आपला तो गंर्धव दुसऱ्याचे ते नाचे, असा विचार या विरोधकांचा आहे. महिलांना दुय्यम वागणूक देणे ही त्यांची संस्कृती आहे.

पण त्यांनी लक्षात ठेवावे की गाल रंगवता वगैरे आम्हालाही येतात. राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्यामध्ये तरबेज आहे. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीचा नव्हे राज्यातील तमाम महिलांचा अपमान करणाऱ्यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा गाल आणि थोबाड रंगवता येते, हे आम्ही दाखवून देऊ. पुढे त्यांनी म्हणू नये की माझ्या वाक्याचा विपर्यास्त केला.

पण लक्षात ठेवा की आम्ही मराठी शाळेत शिकलो आहोत. मराठी म्हणींचा अर्थ आम्हालाही कळतो,’ अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी दरेकरांचा समाचार घेतला आहे.

ताज्या बातम्या

काय चालले देशात:महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार

माय महाराष्ट्र न्यूज:महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुनही महिलांवरील अत्याचार कमी झालेले नाहीत. एका महिला कॉन्स्टेबलने, तीन जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा...

नगर जिल्ह्यात आज ६९५ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या इतक्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली...

अत्यंत म्हत्वाचे:प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम? वाचा सविस्तर

माय महाराष्ट्र न्यूज: देशातल्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असताना आता महाराष्ट्रही हळूहळू अनलॉक होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातली प्रार्थनास्थळं सात ऑक्टोबरपासून उघडण्याचा निर्णय मुख्यमंत्री...

PM kisan :शेतकऱ्यांना 10 व्या हप्त्यात 2000 रुपयांऐवजी मिळणार 4000 रुपये ?

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांऐवजी 4000 रुपये येण्याची शक्यता आहे. मीडिया...

रोहित पवारांचा घरचा आहेर:युवकांच्या भविष्याशी खेळू नका, त्यांचे तिकीटाचे पैसे द्या

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन मोठा सावळा गोंधळ काल रात्री पाहायला मिळाला. हजारो विद्यार्थी परीक्षा केंद्र असलेल्या शहरात जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना परीक्षा पुढे ढकलण्यात...

नगर ब्रेकींग: शेतकऱ्यासह १३ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :शेतामध्ये पेरणी सुरू असताना बांधावर घातल्याने झालेल्या अपघातात पेरणी यंत्रावर बसलेल्या शेतकऱ्याचा व १३ वार्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाला वाडेगव्हाणमधील...
error: Content is protected !!