Saturday, July 2, 2022

विराट कोहलीची धक्कादायक घोषणा

IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
WhatsApp Image 2022-04-23 at 12.19.16 PM
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने याबाबतची माहिती सोशल मीडियावरून दिली आहे. आता तो तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघाचे कर्णधार पद सोडणार आहे का? याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पण त्याने स्वत: याबाबत खुलासा केला आहे.

विराटने आपण टी-२० विश्वचसक स्पर्धेनंतर टी-२० संघाचे कर्णधार पद सोडणार असल्याचे म्हटले आहे. पण तो कसोटी आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधार पदी कायम राहणार आहे असंही त्यानं सांगितले आहे.कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्येही तो कर्णधार राहील. कोहलीने कर्णधारपद सोडल्याच्या बातम्या अलीकडेच समोर आल्या होत्या. यामध्ये असे म्हटले होते

की कोहली टी -20 विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडेल. पण बीसीसीआयने लगेच हे वृत्त फेटाळले. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि कोषाध्यक्ष अरुण धुमाळ दोघांनीही सांगितले होते की, कर्णधारपदामध्ये कोणताही बदल होणार नाही. जोपर्यंत संघ चांगली कामगिरी करत आहे तोपर्यंत असे कोणतेही पाऊल उचलले जाणार नाही.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 45 टी -20 सामने खेळले आहेत आणि त्यातील 29 सामने जिंकले आहेत. केवळ 13 सामन्यांमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची टक्केवारी 65.11 इतकी आहे. 2017 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो टी – 20 संघाचा कर्णधार बनला.

तसेच, 2021 टी 20 विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून पहिली आयसीसी टी-20 स्पर्धा असेल. या स्पर्धेनंतर कोहली कर्णधारपदावरून पायउतार होईल. दरम्यान, विराट कोहलीनंतर भारतीय टी-20 संघाचं कर्णधारपद आक्रमक फलंदाज रोहित शर्माकडे सोपवलं जाईल, अशी चर्चा आहे.

ताज्या बातम्या

नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा गाड्यांची व्यवस्था-आगारव्यवस्थापक अहिरराव ;देवगड मठात होणाऱ्या सप्ताहासाठी ही सेवा देणार

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा डेपोच्या वतीने पंढरपूर आषाढी वारीसाठी जादा बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून पंढरपूरला देवगड मठात दि.४ जुलै ते ११ जुलै या...

राज्यात पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंड्यात भाजपचा जल्लोष

भेंडा राज्यात भारतीय जनता पार्टीची पुन्हा सत्ता येणार म्हणून भेंडा येथे फटाके फोडून व पेढे वाटून भाजपने जल्लोष केला. यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे...

जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणेसाठी उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत-तनपुरे

अहमदनगर/प्रतिनिधी शासनस्तरावर यासाठी एका अभ्यासगटाची नेमणुक होऊन मुंबईसाठी पाणी पुरवठा करणे आणि जायकवाडी जलाशयातील तूट भरून काढणे यासाठीच्या योजना तयार करण्याबाबत उचित कार्यवाहीचे आदेश व्हावेत...

समर्थ पाउलबुद्धेचा सत्कार

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे माजी कामगार संचालक व राष्ट्रवादी साखर कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ पाउलबुद्धे यांचे चिरंजीव व लोणीच्या सैनिकी स्कुलचा...

शिक्षण परिषेदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात नदीकी पाठशाला,नदी साक्षरता कार्यक्रम राबवण्यात येईल-शिक्षण आयुक्त सुरज मांढरे

पुणे/प्रतिनिधी नदी साक्षरते बाबत अगदी बालवया पासून शालेय शिक्षणातून याचा अंतर्भाव केल्यास अत्यंत सकारात्मक परिणाम दिसेल.त्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) माध्यमातून महाराष्ट्रात...

नेवासा तहसीलदारांच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून 16 लाखाचा अपहार

नेवासा तहसीलदारांचा बनावट शिक्का व खोट्या सहीचा वापर करून नैसर्गिक आपत्तीचे पैसे बेकायदेशीरपणे स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्या प्रकरणी नेवासा तहसीलदारांच्या फिर्यादी वरून देडगावच्या कोतवाला विरुद्ध...
error: Content is protected !!