शेवगाव
शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांना ‘अच्छे दिन’ येतील, असे स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या केंद्र व राज्य सरकारने सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. कापूस, कांदा, सोयाबीन, तूर, मुग, उडीद अशा कुठल्याच शेतीमालाला आज समाधानकारक भाव नसल्याने अशा परिस्थितीत जगायचं कसे हा जनतेसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या सरकारला त्यांचे काही घेणे नसल्याची घणाघाती काही घेणे नसल्याची घणाघाती टीका करून या सरकारचे करायचं काय? असा संतप्त सवाल पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले यांनी केला.
महाविकस आघाडीच्या वतीने जनतेच्या विविध ज्वलंत प्रश्नासाठी शहरातील क्रांती चौकात शनिवार दि.४ मार्च रोजी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश मोर्चा व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनात तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी कांदयाच्या तसेच कापसाच्या माळा घालून शासनाच्या शेतकरी विरोधी भूमिकेचा निषेध नोंदविला. यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, बाजार समितीचे माजी सभापती संजय फडके, अॅड अनिल मडके, कॉ. नांगरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, राष्ट्रवादी युवा सेनेचे तालुकाध्यक्ष ताहेर पटेल, समीर शेख, संतोष जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे नेते एकनाथ कुसळकर, युवा सेना प्रमुख शीतल पुरनाळे, काँग्रेसचे डॉ. अमोल फडके, तालुकाध्यक्ष समद काझी, कॉ. नांगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. प्रशिक्षणार्थी तहसीलदार राहुल गुरव यांनी निवेदन स्वीकारले. पोलीस शेतकऱ्यांनी कांद्याच्या निरीक्षक विलास पुजारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.