Monday, October 18, 2021

सर्वसामान्यांना मोठा शॉक, महिन्याचे बिल भरले नाही तर वीज कनेक्शन थेट कट

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सर्वसामान्यांना धक्का देणारी बातमी. ऐन सणासुदीत MSEB ने ग्राहकांना चांगलाच शॉक दिला आहे. एक महिन्याचं वीजबिल थकल्यास MSEB वीज कापणार आहे. सध्या मुंबईतील भांडूप परिमंडळात कारवाई सुरु करण्यात आली आहे. ऐन गणपतीत कारवाईने नागरिक संतप्त झाले आहेत. 

तुमचे एका महिन्याचे विद्युतबिल बाकी असेल तरी महावितरणाचे अधिकारी तुमच्या घरचे वीज कनेक्शन तोडणार आहेत. ऐन सणासुदीला महावितरण अधिकाऱ्यांनीच ही धक्कादायक बातमी दिली आहे. विशेष म्हणजे याबाबत अधिकाऱ्यांना कोणताही लेखी आदेश आलेला नाही. केवळ  व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना केल्याचा खुलासा या अधिकाऱ्यांनी दिला. भांडूप परिसरात महावितरणाने ही कारवाई सुरु केली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. दरम्यान, काहींनी पैसे भरुनही विद्युत जोडणी तोडण्यात येत असल्याने त्यांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. ऑनलाईन पैसे भरले तरीही विद्युत बिल भरले नाही, असे सांगण्यात येत आहे.

याबाबत काही ग्राहकांनी संपर्क साधल्यानंतर सांगण्यात आले की, MSEBच्या सर्व्हरमध्ये समस्या होती. त्यामुळे ते बिल भरले की नाही, हे समजले नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही आमची समस्या नाही, असे ग्राहकांकडून सांगण्यात आले. त्यावेळी तुम्ही आधी जे काही पैसे आहेत, ते भरा.

नंतर तुमचा विद्युत पुरवठा पूर्ववत होईल, असे MSEBकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांच्या संतापात अधिक भर पडत आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!