Friday, October 22, 2021

बारवर सुरू होते असे काही  पोलिसांनी छापा टाकत 10 महिलांसह 31 जणांना अटक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. त्यामुळे नियमांचे पालन करण्याचं आवाहन सरकारकडून सतत्याने करण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी अनेक ठिकआणी नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात बार  सुरू असून त्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत

असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. पोलिसांनी बारवर छापा टाकला त्यावेळी तेथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं.ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने एका बारवर गुरुवारी रात्री छापा टाकला आणि कारवाई केली.

यावेळी बारमध्ये अश्लिल कृत्य करत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी घटनास्थळावरुन 10 महिलांसह 21 जणांना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एका टीमने कल्याण-मानपाडा रोडवर असलेल्या एका बारवर छापा मारला.

यावेळी बारमध्ये अनेकजण हे फेसमास्क शिवाय आढळून आले. तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचं दिसून आलं. इतकेच नाही तर ग्राहकांना दारू आणि इतर अन्नपदार्थ सर्व करणाऱ्या महिलांनी योग्य कपडे परिधान केले नव्हते. यासोबतच अश्लिल कृत्य सुद्धा सुरू होते.

पोलिसांनी सांगितले की, आम्ही बारमधून 10 महिलांसह वेटर आणि 19 ग्राहकांसह दोन कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यासोबतच म्युझिक सिस्टम आणि 24300 रुपयांचे इतरही साहित्य जप्त केले आहेत. या सर्वांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...

नगरमध्ये दोन भावांकडून महिलेची छेडछाड लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत…

माय महाराष्ट्र न्यूज:दोन भावांनी एका विधवा महिलेची छेडछाड करीत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून विकास शामसुंदर गायकवाड...

फडणवीसांची जिरवायची हे गडकरींसोबत आधीच ठरलं होत: काँग्रेस नेत्यांचा खळबळजनक दावा

माय महाराष्ट्र न्यूज:नांदेड इथल्या बिलोली येथे आयोजित प्रचारसभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला बहुमत जरी...
error: Content is protected !!