Monday, October 25, 2021

नेवासा तालुक्यात एका व्यक्तीची त्याच्याच मुलांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून केली हत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: एकाहत्तर वर्षीय शेतकऱ्याची त्याच्याच मुलांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. नेवासे तालुक्यातील कारेगाव येथे शुक्रवारी (ता. १७) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी मृताच्या दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून नेवासे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला.

लक्ष्मण दादा लोणारे (वय ७१, रा. कारेगाव, ता. नेवासे) असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी मृताची दुसरी पत्नी सुनीता ऊर्फ शालनबाई लोणारे यांनी नेवासे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीत म्हटले आहे, की लक्ष्मण लोणारे यांनी पंधरा वर्षांपूर्वी रांजणगावमध्ये जमीन खरेदी केली होती.

पहिली पत्नी चंद्रकलाबाई व मुले भाऊसाहेब, अशोक यांच्यासह ते येथे राहत होते. दरम्यान, पत्नीशी वाद झाल्याने ते पुन्हा कारेगाव येथे राहण्यास आले. २०१५मध्ये त्यांनी आपल्याशी विवाह केला.दरम्यान, शुक्रवारी (ता. १०) लक्ष्मण लोणारे घोडेगाव येथे गेले असता, त्यांना वडाळा बहिरोबा येथे पहिली पत्नी चंद्रकला भेटली.

शेतीचा वाद लवकरात लवकर मिटव, नाही तर तुला संपवून टाकीन, अशी धमकी तिने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, आज (शुक्रवारी) पहाटे मृत लक्ष्मण प्रातर्विधीसाठी शेतात गेले, ते परत न आल्याने फिर्यादीने शोध घेतला असता, भाऊसाहेब लोणारे (वय ३२) व अशोक लोणारे (वय ३४) हे मक्याच्या शेतातून पळताना त्यांना दिसले.

तसेच, लक्ष्मण लोणारे यांच्या हातावर, डोक्यात व कपाळावर धारदार शस्त्राचे वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांना दिसले.नेवासे पोलिसांनी मृत लक्ष्मण लोणारे यांची मुले भाऊसाहेब व अशोक यांना ताब्यात घेतले आहे

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!