Friday, October 22, 2021

रेशन कार्डाशी संबंधित ‘या’ सेवा सेतू सुविधा केंद्रात मिळणार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:रेशन कार्डाशी संबंधित सेवा घेण्यासाठी तुम्हाला आता सरकारी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज लागणार नाही. कारण, डिजीटल इंडिया अभियानांतर्गत सेतु सुविधा केंद्रात रेशन कार्डाशी संबंधित अनेक सेवा तत्काळ मिळणार आहेत.रेशन कार्डासाठी अर्ज करणे व त्यामध्ये बदल करण्यासारख्या कामासाठी तुम्ही जवळच्या सेतू सुविधा केंद्रा जाऊ शकता. ही माहिती डिजीटल इंडियाने ट्विट करून दिली आहे.

काय म्हटले आहे डिजीटल इंडियाने?
डिजीटल इंडियाने ट्विटरमध्ये म्हणाले, की सेतू सुविधा केंद्रांनी सार्वजनिक वितरण विभागाशी सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे देशातील 3.70 लाख सेतू सुविधा केंद्रांमधून रेशन कार्डशी संबंधित सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याचा देशातील 23.64 कोटी रेशन कार्डधारकांना फायदा होईल, याचा विश्वास आहे.

सेतू सुविधा केंद्रात या मिळणार सेवा

रेशन कार्ड किती उपलब्ध आहे, याची माहिती मिळेल.

रेशन कार्डाशी संबंधित माहिती सेतू सुविधा केंद्रात अपडेट करता येईल.

रेशन कार्ड हरविले तर नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करता येईल.

रेशन कार्डामधील तपशीलामध्ये माहिती अपडेट करता येईल.

रेशन कार्ड हे आधारशी संलग्न करता येईल.

रेशन कार्डची नक्कल प्रिंट काढता येईल.

हे आहेत रेशन कार्डाचे प्रकार?
उत्पन्नावर आधारित रेशन कार्ड नागरिकांना दिले जाते. दारिद्र्य रेषेवरील लोकांना एपीएल, दारिद्र्य रेषेखालील नागरिकांकरिता बीपीएल आणि सर्वात गरीब असलेल्या नागरिकांना अंत्योदय ही तीन प्रकारची रेशन कार्ड दिली जातात. ही वर्गवारी कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नावर निश्चित केली जाते.

रेशन कार्डासाठी काय आहे पात्रता?
देशातील प्रत्येक भारतीय नागरिकाला रेशन कार्डासाठी अर्ज करता येईल. 18 वर्षांहून कमी वयाच्या मुलांचा रेशन कार्डामध्ये समावेश करण्यात येतो. जर 18 वर्षांहून अधिक वय असेल तर रेशन कार्डासाठी अर्ज करता येतो.
दरम्यान, एक देश एक रेशनकार्ड योजनेची देशात अंमलबजावणी करण्यात येत आहे.

त्यामध्ये नागरिकांना केंद्रित ठेवून योजनेचे स्वरुप तयार करण्यात आले आहे. या योजनेमधून अन्न सुरक्षा कायदा आणि इतर सामाजिक योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!