Monday, October 18, 2021

महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांचे मोठे विधान :भाजपचे अनेक नेते आघाडीत येण्यास इच्छुक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपमध्ये सध्या अस्वस्थता आहे. भाजपचे अनेक नेते कॉंग्रेस, शिवेसना, राष्ट्रवादीमध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे ते आमचे भविष्यात सहकारी होऊ शकतात, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद मध्ये एका कार्यक्रमात आजी-माजी एकत्र आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला. त्यावेळी व्यासपीठावर भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. त्यावर मंत्री थोरात म्हणाले, भाजपाच्या गोटात प्रचंड नैराश्‍य आहे.

अनेकजण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. ते भाजप सोडून आघाडीतील कुणाकडेही जाऊ शकतात आणि आमचेही सहकारी होऊ शकतात.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचक विधानाबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून ते अशीच भविष्यवाणी करीत आहेत. आघाडीला मात्र कसालाही धोका नाही.

येणारी तीन वर्ष आघाडी सरकार मजबूत राहील. त्यापुढे ही एक राहू शकते असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.जीएसटी परिषदेच्या पेट्रोल, डीझेलच्या निर्णयाबद्दल विचारले असता ते म्हणाले, की त्याचा परिणामांचा विचार केंद्र आणि राज्य म्हणून झाला पाहिजे. राज्यांना जीएसटी मधून किती हिस्सा मिळणार हे समजले पाहिजे.

केंद्राने राज्याचे तीस-चाळीस हजार कोटी जीएसटीचे न दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार, करोना उपाययोजना यासाठी पैशाच्या अडचणी आहेत.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!