Friday, October 22, 2021

काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार झाले:राधाकृष्ण विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये केलेल्या ‘भावी सहकारी’ या वक्तव्यावर भाजपमधील बहुतांश नेते युती होणार हीच अपेक्षा ठेवून बोलत असल्याचे दिसते. माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही अशीच अपेक्षा व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

‘राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र नसतो. केव्हाही काहीही चमत्कार होऊ शकतो,’ असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.विखे पाटील अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विधानांवरून सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत.

यासंबंधी विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही युतीच्या दृष्टीने सूचक वक्तव्य केले. मात्र, काँग्रेसवर सडकून टीका केली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे नेते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपमधील काही नेते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक आहेत, असे वक्तव्य केले होते.

यावर बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते सत्तेसाठी लाचार झाले आहेत. अशी विधाने करून ते स्वत:चे आणखी अवमूल्यन करून घेत आहेत. लाचारपणे वागून सत्तेला टीकून आहेत. काँग्रेस पक्षाची आजची आवस्था पाहिली तर पक्षापेक्षा व्यक्तीचे हित अधिक पाहिले जात आहे. अशा नेत्यांनी मुंगेरीलालसारखी स्वप्ने पाहू नयेत,’ असेही विखे पाटील म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या वक्तव्यावर मात्र त्यांनी बोलणे टाळले.मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबादमधील वक्तव्यासंबंधी विखे पाटील म्हणाले, ‘राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. सध्या महाविकास आघाडीची जी मोट बांधलेली आहे ती वैचारिक नव्हे तर सत्तेसाठी आहे. त्या उलट भाजप-सेना हे गेल्या पंचवीस वर्षांपासून वैचारिक दृष्टया एकत्र राहू काम करीत आहेत.

सत्ता असली आणि नसली तरी ते एकत्र होते. ते पुन्हा एकत्र येत असतील तर आपण स्वागतच केले पाहिजे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केलेले हे विधान कोणत्या संदर्भाने केले, याची मला कल्पना नाही. त्यांचे ते व्यक्तीगत मतही असू शकते. असे असले तरी राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी शत्रू अगर मित्र राहू शकत नाही.

त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो,’ असेही विखे पाटील म्हणाले.

ताज्या बातम्या

पेट्रोल व डिझेल पुन्हा महाग; जाणून घ्या तुमच्या शहरात आजचे नविन दर

माय महाराष्ट्र न्यूज:आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या उडीमुळे 28 सप्टेंबरला पेट्रोलच्या किंमती आणि 24 सप्टेंबर रोजी डिझेलच्या किंमतीवरील ब्रेक संपले. भारतात स्थानिक कर (व्हॅट) आणि...

माजी आमदार मुरकुटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला बळ देण्यासाठी थेट अजित पवारांकडून आग्रह

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण नेहमी राज्याच्या राजकारणात नेहमी वरचढ ठरले आहे. जिल्ह्यातील अनेक नेते हे राज्याचे राजकारण चालवतात.यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण...

शिवाजी कर्डिले म्हणाले खा विखेंच्या म्हणण्यानुसार मी जर आमदार झालो, तर ?…

माय महाराष्ट्र न्यूज:नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी खा. डॉ.सूजय विखे , आ. बबनराव पाचपुते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित...

करोना महामारी सहा महिन्यांत संपणार:,नगर जिल्ह्यातील भगत यांची भविष्यवाणी

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील ग्रामदैवत राजा विरभद्र देवस्थानचा तीन दिवसीय यात्रा उत्सवाची सांगता गुरुवारी भगत यांच्या होईकाने शांततेत पार...

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...
error: Content is protected !!