Friday, October 22, 2021

संजय राऊत यांच्या अंगात आलं अन् महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं काँग्रेसच्या या मंत्र्यांचे विधान

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अंगात आलं अन् महाविकस आघाडी सरकार झालं. अंगात आलं ते बरंच झालं, असं विधान काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोलापुरात केले आहे.महाराष्ट्राच्या इतिहासात अशा गोष्टी कधी घडल्या नाहीत, त्या आता घडत आहेत.

महाविकास आघाडी सरकार हे संजय राऊत यांच्या अंगात आल्याने अस्तित्वात आलं आहे आणि जे झालं ते चांगलंच झालं, असं वक्तव्य सोलापूर दौऱ्यावर असताना डॉ. विश्वजित कदम यांनी केले आहे. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘आजी माजी आणि भावी’ या विधानावरुन राज्यातील वातावरण तापले आहे. भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. अनेक ज्येष्ठ नेते आपआपल्या परिने प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच विश्वजित कदम यांचं हे वक्तव्य पुन्हा नवीन राजकीय चर्चांना उधान आणतं का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देत इंग्रजांना हाकलून दिले. तर भाजप काय चीज आहे? यांनाही सत्तेवरून पायउतार करण्यासाठी तयार राहा. आज रस्त्यावरील लढाईसोबत सोशल मीडियावरील लढाई लढायची आहे. गेली सात वर्षे भाजप देशाची फसवणूक करत आहे, असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना काँग्रेस भवन येथे केले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात कांद्याच्या भावात मोठी घसरण

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होतं पण पुन्हा कांद्याच्या भावात घसरण...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु ; हे आहे नियम

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृहे सुरु होणारेत. तसंच आजपासून अम्युझमेंट पार्कही खुली केली जाणार आहेत.सुरुवातील राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर...

नगर ब्रेकिंग:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला पळवून नेले

    माय महाराष्ट्र न्यूज:दोन मुले असलेल्या बापाने लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय अविवाहित तरूणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना दि. 19 ऑक्टोबर रोजी घडली.अहमदनगर जिल्ह्यातील...

जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना नगरचे पालकमंत्री जनतेला लुटत होते

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका...

विखे-पाटील यांना नैराश्याने ग्रासले

माय महाराष्ट्र न्यूज : भाजपचे तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धती देशाच्या, जनतेच्या हिताची नाही. त्यामुळे राज्यात किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार येत्या महापालिका...

बापरे:कोरोनाचा नव्या रुपातील विषाणू आढळून आला

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे शंभर कोटीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. त्यानिमित्त डॉ. मांडे यांच्याशी सीएसआयआर मुख्यालयात सकाळने संवाद साधला. कोरोनाचा नव्या रुपातील...
error: Content is protected !!