Wednesday, October 27, 2021

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांला कोरोनाची लागण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्र गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्णसंख्या अधिक होत आहे. महाराष्ट्रात पहिल्या व दुसऱ्या लाटेत याचा खूप मोठा फटका बसला आहे. दुसऱ्या लाटेमध्ये तर अनेक कुटुंब यामुळे उध्वस्त झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोना रुग्ण संख्याही वाढतच आहे. साधरण दररोज 500 हून अधिक रुग्ण हे जिल्ह्यात आढळून येत आहे.

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेमध्ये दररोज दीड हजाराहून अधिक रुग्ण हे सापडत होते.त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाने कटक निर्बंध लागू केले होते आणि सरकारच्या वतीने हे अहमदनगर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याच्या सूचना देण्यात आले होते. राज्यात अजूनही काही जिल्हे आहे तेथे रुग्ण संख्या जास्त आहे यामध्ये अहमदनगर ,पुणे ,सातारा, सांगली आली या जिल्ह्याचा प्रामुख्याने रुग्ण संख्या जास्त आहे.

या कोरोना आजारात मध्ये सर्वसामान्य नागरिकांबरोबरच लोकप्रतिनिधीही काही प्रमाणात पॉझिटिव्ह आढळून आले होते. सर्वसामान्यांचे या आजाराने कंबरडे मोडले आहे तर अनेक घरांमध्ये कुटुंब यामुळे उध्वस्त झाले आहे.अनेक लोकप्रतिनिधी यामध्ये पॉझिटिव्ह आढळून आले होते .

अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कोपरगाव मतदार संघाचे आमदार आशुतोष काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मधून दिले आहे. त्यांनी नुकताच साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला होता.

आशुतोष काळें यांची फेसबुक पोस्ट:
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी . श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल.

यापूर्वी महाराष्ट्रातील या मंत्र्यांना कोरोनाची लागण:
यात जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, . कापड उद्योग आणि मत्स्य व्यवसायमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!