Wednesday, October 27, 2021

या ५ गोष्टी टाळल्या तर नक्की होता येईल तुम्हाला श्रीमंत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: आर्थिक सुबत्ता ही आयुष्यात अत्यंत महत्त्वाची असते. मात्र श्रीमंत होण्यासाठी योग्य प्रकारे गुंतवणूक करणे आवश्यक असते. अनेकवेळा सर्वसामान्य गुंतवणुकदार काही चुका करतात, ज्यामुळे ते मोठी संपत्ती निर्माण करू शकत नाहीत. गुंतवणूक करताना बहुतांश लोक त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व देतात.

यामुळे अनेकवेळा त्यांचे निर्णय चुकतात. गुंतवणूक करताना घेतलेले चुकीचे निर्णय आर्थिक प्रगतीच्या वाटेतील अडथळे बनतात. गुंतवणूक करताना काय करावे हे जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे गुंतवणूक करताना नेमके काय करू नये हेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. गुंतवणूक करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ते पाहूया.

१. आपले मित्र, परिचित, नातेवाईक यांच्याशी गुंतवणुकीबाबत नेहमी चर्चा केली जाते. ते ज्या प्रकारात गुंतवणूक करत असतील किंवा त्यांनी जी काही सूचना केली असेल ती तशीच्या तशी अंमलात आणली जाते. ही एक सर्रास केली जाणारी चूक आहे. इतरांनी मग ते आपल्या कितीही जवळचे असोत ज्या पद्धतीने गुंतवणूक केली आहे, तशीच गुंतवणूक

आपणही करण्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यांना जरी त्यांच्या गुंतवणुकीने चांगला परतावा दिला असला तरी ती गुंतवणूक तुमच्यासाठी हितकारकच असेल असे अजिबात नाही. गुंतवणूक करताना प्रत्येकाने आपले वय, आपली आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता, उत्पन्न इत्यादी बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

२. गुंतवणूक करताना आपला पोर्टफोलिओ तयार करा. म्हणजे विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणूक विभागून ठेवा. एखाद्या गुंतवणूक प्रकारातून चांगला अनुभव किंवा परतावा मिळाल्यास त्याकडेच लक्ष देणे किंवा सर्व गुंतवणूक त्याच गुंतवणूक प्रकाराकडे वळवणे, ही अनेकवेळा केली जाणारी चूक आहे. यामुळे गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ संतुलित न होता त्यातील जोखीम वाढत जाते.

अनेकवेळा म्युच्युअल फंड किंवा शेअर्ससारख्या गुंतवणुकीत ही चूक आढळून येते. अनेकवेळा एकाच प्रकारची गुंतवणूक ट्रॅक करण्यास सोपी असते म्हणून काही जण ठराविक प्रकारातच गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. एकाच प्रकारची गुंतवणूक केल्यामुळे आर्थिक नियोजन अपूर्ण स्वरुपाचे राहते.

३. गुंतवणूक ही नेहमी दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवत केली पाहिजे. लगेचच मोठा फायदा होईल असा विचार करून गुंतवणूक करू नये. काही लोक चटकन एखाद्या गुंतवणुकीतून फायदा होत नाही असे वाटून एका गुंतवणूक प्रकारातून गुंतवणूक काढून  घेतात आणि ज्यातून जास्त परतावा मिळेल असे वाटते त्यामध्ये पैसे गुंतवतात.

यामुळे कोणत्याही एका गुंतवणूक प्रकारात पैसे दीर्घकालावधीसाठी गुंतवलेले राहत नसल्यामुळे अखेर गुंतवणुकीतून मिळणारा परतावा आणि लाभ मिळतच नाही. मोठी रक्कम उभारण्यासाठी संयमाने गुंतवणूक करा.

4.श्रीमंत होण्यासाठी किंवा संपत्ती निर्मितीसाठी काही कालावधी लागतो. एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करून लगेचच काही दिवसात प्रचंड पैसा कमावता येत नाही. ही धोकादायक मानसिकता आहे. यामुळे फायदा होण्यापेक्षा नुकसानच होण्याची शक्यता जास्त असते. कोणताही गुंतवणूक प्रकार म्हणजे जादूची कांडी नव्हे. प्रत्येक गुंतवणूक प्रकाराचे काही फायदे असतात आणि काही मर्यादा. एका विशिष्ट पद्धतीने

कोणत्याही गुंतवणूक प्रकारातून पैसा निर्माण होत असतो. ते लक्षात न घेता चटकन श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहत गुंतवणूक केल्यास आणि अवाजवी अपेक्षा ठेवल्यास अपेक्षाभंग होत, गुंतवणुकीच्या मूळ उद्देशालाच धक्का पोचतो. या मानसिकतेमुळे नफ्यापेक्षा तोटा होण्याचीच शक्यता अधिक असते.

5.नियमितपणे सातत्यपूर्ण आणि शिस्तबद्धपणे गुंतवणूक केल्यावरच मोठी संपत्ती निर्माण होत असते. बऱ्याचवेळा गुंतवणुकीत सातत्य नसते किंवा धरसोड केली जाते. यामुळे दीर्घकाळात त्यातून मिळणारा लाभ मिळत नाही. तुम्ही दरमहा थोडीशी गुंतवणूक करा मात्र ती नियमितपणे केली पाहिजे. नियमितपणे केलेली छोटीशी गुंतवणूक की कधातरी केलेल्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक लाभकारक असते.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!