Monday, October 25, 2021

देवेंद्र फडणवीस असे नेते आहेत जे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आमचे देवेंद्र फडणवीस असे दंबग नेते आहेत की, ते अशा 100 अजित पवारांना खिशात घेऊन फिरतात.’ असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकारांनी त्यांना राज्यातील सत्तासमीकरणाबाबत विचारणा केली असता त्यांनी अशा स्वरुपाचं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट देखील केला आहे.

‘मागच्या टर्मलाच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याच्या हलचाली करत होते. एका बजेटमध्ये तसे प्रयत्न देखील झाले होते.’ अशी खळबळजनक माहिती चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली आहे.

‘आमचे देवेंद्र फडणवीस हे असे दबंग नेते आहेत की, जे असे 100 अजित पवार खिशात घेऊन फिरतात. ते काही उद्धव ठाकरेंसारखे नाहीत की, त्यांना माहितच नाही की चाललंय काय. नंतर म्हणतील मला काही माहितच नव्हतंच काय सुरु आहे ते. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या कमी वयाकडे पाहू नका. संपूर्ण पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले ते मुख्यमंत्री आहेत. ही गोष्ट काही सोप्पी नव्हती. अनेक वर्षानंतर असं घडलं आहे.’

‘तेव्हा देखील शिवसेनेने आम्हाला प्रचंड त्रास दिला होता. तसंच तेव्हा देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी प्रयत्न केला होता की, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी मिळून सरकार स्थापन करावं. एका बजेटमध्ये तसा प्रयत्न देखील झाला होता. पण देवेंद्र फडणवीस हे ठामपणे उभे राहिले आणि टिकले देखील.’

‘2019 विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय ही एक ‘कॅल्क्युलेटेड रिस्क’ होती.’ असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.दरम्यान, चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं कशा पद्धतीने त्यांना उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

ताज्या बातम्या

मोठी बातमी:आरोग्य विभागाची 31 ऑक्‍टोबरची परीक्षा रद्द होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे...

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...
error: Content is protected !!