Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्हयातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज कोरोना आढावा बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बोलत होते.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित, जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, महापालिकेचे आयुक्त गोरे, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक पोखरणा यावेळी उपस्थित होते.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी कोरोना नियंत्रणासाठी शासनाने जारी केलेल्या निर्बधासोबतच एका पॉझिटिव्ह रुग्णामागे त्याच्या संपर्कातील तीस व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्तांनी बैठकीत सूचित केले. यासोबतच ज्या

ठिकाणी कंटेमनमेंट झोन जाहिर करण्यात आला आहे तेथे नागरिकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध घालणे, दहा टक्कयापेक्षा अधीक रुग्ण असलेल्या परिसरात लॉकडाऊन करणे, आठवडी बाजार बंद ठेवणे, मास्क न घालणाऱ्या ग्राहकांना सामान देणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करणे, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे, कोरोना संसर्गास कारणीभूत

ठरणाऱ्या आणि प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या आस्थापना बंद करणे, होम आयसोलेशन बंद करणे, बंद कोविड सेंटर पुन्हा सुरु करणे, लसीकरण वाढविणे आदि उपाययोजना अंमलात आणण्याची सूचनाही विभागीय आयुक्तांनी केली. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी प्रशासनातर्फे जिल्हयात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!