Wednesday, October 27, 2021

प्रयागराजमधील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र:प्रयागराजमधील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांची संशयास्पद मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर आली आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे.

कारण, पोलिस तपासा दरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतंय. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्याचं समोर आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह

बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांच्या मठातील खोलीत मिळून आला. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत

 होता आणि खोलीचे सर्व दरवाजे बंद होते. खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांकडून निवेदन जारी :प्रयागराज पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की घटनास्थळावर जवळपास 7 पानी चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी आणि अन्य शिष्यांचं नाव लिहिलं आहे. तसंच ते अनेक कारणांमुळे मानसिक तणावातून जात होते. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.

आश्रमाचं काय करायचं? चिठ्ठीत उल्लेख:महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये आश्रमबाबत काय करायचं याबाबतही लिहिलं आहे. तसंच कुणाची काळजी घ्यायची. कुणाला काय द्यायचं आहे, याबाबतही त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय. आपल्या शिष्यांमुळे दु:खी असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

पंतप्रधान मोदींकडून श्रद्धांजली:आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री नरेंद्र गिरी यांचा मृत्यू अत्यंत दु:खद आहे. अध्यात्मिक परंपरांप्रति समर्पित भावनेतून त्यांनी संत समाजातील अनेक धारा एकत्र जोडण्यात मोठी भूमिका बजावली आहे. देव त्यांना आपल्या चणी स्थान देवो’, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!