Wednesday, October 27, 2021

देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले: विखे पाटील

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा आगामी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी संकल्प मेळावा शिर्डी येथे संपन्न झाला. याप्रसंगी आ. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.राज्य सरकारकडून लोकांना अपेक्षा राहिलेल्या नाहीत. एकीकडे परमिट रूम , बार , मॉल, लोकल प्रवास अशी गर्दीचे ठिकाणे सुरू आहेत. मात्र शाळा आणि मंदिरे बंद ठेवले आहेत. देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शिर्डीचे अर्थकारण साई मंदिरावर अवलंबून आहे. मंदिर बंद असल्याने अनेकांचा रोजगार गेला. महाराष्ट्रात धार्मिक स्थळे बंद असतांना इतर राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे सुरू आहे. तिरुपतीचे बालाजी मंदिर भाविकांसाठी सुरू आहे. बालाजीला दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना करोना होत नाही, मात्र शिर्डीला येणार्‍यांना भाविकांना त्रास होतो की काय? असा उपरोधिक सवालही त्यांनी केला.

गर्दीची सर्व ठिकाणे सुरू केली आहेत. लोकलने दररोज सुमारे 50 लाख लोक प्रवास करत आहेत. अशा ठिकाणी सरकार परवानगी देते, मात्र मंदिरे बंद ठेवली जातात. शिर्डीतील नोंदणीकृत दुकानदार व्यावसायिक, हातगाडीवाले या सर्वांचा व्यावसायिक कर शासनाने माफ करावा व त्याबदल्यात नगरपंचायत नगरपालिकांना शासनाने अनुदान द्यावे. कर्जाचे हप्ते पाडून मिळावे

 यासाठी आपण केंद्र सरकारला विनंती करणार आहोत. पंतप्रधानांची भेट घेऊन धार्मिक तीर्थस्थळांवर अर्थकारण अवलंबून असलेल्या राज्यातील सर्वच ठिकाणच्या व्यावसायिकांना व्यवसायिक करातून शंभर टक्के सूट व बँकांच्या कर्जाच्या हप्त्यात दिलासा देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

यंदाची थंडी जोरदार; हवामान खात्याचा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:देशात वातावरणात गारठा वाढला असून हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हिवाळा अद्याप सुरू झाला नसला तरी यंदाची थंडी हाडं गोठवणारी असणार आहे अशी...

नगर ब्रेकींग :मोठा अपघात तरुण व्यावसायिक ठार; कारचा चक्काचूर

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर खुर्द शिवारात झालेल्या भीषण अपघातात कृष्णा सुभाष करपे हा तरुण व्यावसायिक ठार झाला या घटनांनी संपूर्ण शहरातून हळहळ...

नगर जिल्ह्यातील घटना:16 वर्षांच्या मुलांची वडिलांना होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर वाडेकर गल्ली येथील श्रेयस गणेश वाडेकर या तरुणाने मानसिक संतापातून मंगळवारी सकाळी घरातच पंख्याला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची...

बापरे:नगरमध्ये उच्चभ्रू वस्तीत सुरू होता हा धक्कादायक प्रकार;तीन महिलांची सुटका

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहरात उच्चभ्रू वस्तीत पश्निम बंगालमधील महिलांना आणून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले. डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने नगर...

नगर जिल्ह्यातील प्रकार: एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला अखेर…

माय महाराष्ट्र न्यूज:एकतर्फी प्रेमातून तरुणीवर सत्तूरने हल्ला केल्याबद्दल असिफ कबीर पठाण (रा. हरेगाव, ता. श्रीरामपूर) याला सात वर्ष सक्‍तमजुरी आणि 35 हजार रुपये दंडाची...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी

माय महाराष्ट्र न्यूज :  ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्यात येणार...
error: Content is protected !!