Monday, October 18, 2021

नगर जिल्ह्यात :वाळू तस्कराने महिला तलाठीचा विनयभंग

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथील प्रवरा नदी पाञातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसापुर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरु झाला का ? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका महिला कामगार तलाठीस अश्लिल शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा

आणल्याप्रकरणी वाळू तस्करावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सुञा कडून समजलेली माहिती अशी की,तालुक्यातील महिला कामगार तलाठी व दोन कर्मचारी चिंचोलीफाटा येथिल प्रवरा नदी पाञात पाहणी करीत असताना तेथे वाळू तस्करी करणारा महेश राजेंद्र सोनवणे आला व त्याने महिला तलाठीस तु माझे वाळूचे

तरफा कोणाला विचारुन सोडून दिले. असे म्हणून अश्लिल भाषेत शिवीगाळ करुन लज्जा उत्तन्न होईल असे वर्तन करुन’ तु चिंचोलीफाटा येथे कशी काम करते’ तेच पाहतो अशी धमकी देवून महिला तलाठी हिचा विनयभंग करुन सरकारी कामात अडथळा आणला.सदर महिला तलाठी कामगार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महेश राजेंद्र सोनवणे यांच्या

विरोधात सरकारी महिला कर्मचारीचा विनयभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहे. चिंचोली फाटा येथिल प्रवरा नदी पाञातील वाळू चोरी रोखण्यासाठी संबधित महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना मीच कार्यवाहीसाठी पाठविले होते.

मुजोर वाळू तस्कर जर महिला कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत बोलणार असतील तर अशा मुजोर वाळू तस्काराविरोधात कडक कारवाई झाली पाहिजे.यापुढील काळात चिंचोली फाटा येथिल प्रवरा नदी पाञात वाळू तस्काराविरोधात नियमित कारवाई केली जाईल असे राहुरीचे तहसिलदार एफ.आर.शेख यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!