Sunday, October 17, 2021

मुलीसोबत फोटो व्हायरल करण्याची धमकी, महंत नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. श्री बाघम्बरी मठात महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत आढळला होता. ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाजवळ

 एक सुसाईड नोट आढळून आली असून त्यात धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर त्यांची 12 पानी सुसाईड नोट समोर आली आहे. ज्यात त्यांनी आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांना त्यांच्या मृत्यूसाठी दोषी ठरवलं आहे. यासोबत त्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख केला आहे.

मुलीसोबतचा फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली जात असल्याचं या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. 13 सप्टेंबर रोजी आत्महत्या करायची होती, पण हिंमत झाली नाही असं यात लिहिण्यात आलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांना जे पत्र मिळाले ते 13 तारखेलाच लिहिलं गेलं आहे.

नंतर तारीख खोडून 20 सप्टेंबर अशी लिहिण्यात आली. नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांची नावं 5 वेळा लिहिली आहेत. यामध्ये प्रामुख्याने आनंद गिरी, आद्य तिवारी, संदीप तिवारी यांच्यासह अनेक लोकांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी यांची खोली आतून बंद होती. ज्यानंतर संशय निर्माण झाला आणि त्यांची खोली उघडण्यात आली.

खोलीमध्ये महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह खांब्याला लटकलेल्या अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सांगितलं जात आहे की, महंत नरेंद्र गिरी गेल्या अनेक दिवसांपासून काही शिष्यांमुळे तणावात होते.आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अयोध्येत शोककळा पसरली आहे.

हनुमानगडीतील राजू दास यांनी सांगितलं की, आखाडा परिषदेच्या अध्यक्षांच्या निधनाचं वृत्त खूप दु:खदायक आहे. सनातन धर्माच्या रक्षेसाठी ते सदैव तत्पर होते.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!