Monday, October 25, 2021

चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना भगवा ध्वज वरून टोला 

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्टण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. याची जोमात तयारी देखील सुरु आहे.दरम्यान, यावर राजकारण देखील पहायला मिळत आहे. रोहित पवार यांच्यावर टीका देखील होत आहे.

या टीकाकारांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. रोहित पवार भगवा ध्वज उभारत असतील तर कुणाच्या पोटात का दुखत, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांच पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांच पाटील म्हणाले, “भगवा ध्वज हा मुळात कुणा पक्षाचा नाही आहे. जरी शिवसेनेचा हा पक्ष ध्वज असला तरी भगवा ध्वज हे हिंदू धर्माचं, वारकऱ्यांच आणि संतांचं प्रतीक आहे. तो कुणाचा ध्वज नाही आहे. त्यामुळे रोहित पवारांनी जो ध्वज लावला तो शिवसेनेचा लावला की हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून लावला हा शोधण्याचा विषय आहे.

या देशातील वाद हिंदुत्व माननं आणि न माननं ऐवढाच मर्यादित राहिलेला आहे. ते जर हिंदुत्व मानत असतील तर आनंद आहे.

ताज्या बातम्या

भारत विरुद्ध पाकिस्तानचा विजय; वर्ल्डकपमध्ये भारताला पहिल्यांदाच पराभव

माय महाराष्ट्र न्यूज:टि 20 कपमध्ये अखेर पाकिस्तानने टीम इंडियावर विजय मिळवला आहे. भारताने ठेवलेलं 153 रनचं आव्हान पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर...

नगर ब्रेकींग:मोठा अपघात: अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा येथील नगर – औरंगाबाद महामार्गावर हॉटेल बहार नजीक असलेला दुभाजक ओलांडताना नेवासा फाटा लगत असलेल्या...

नगर ब्रेकींग:अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार अखेर आरोपीला…

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता. अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी...

राष्ट्रवादीच्या या नेत्यांचा आरोप खा सुजय विखे हे पदाची पातळी सोडून बोलत आहे

माय महाराष्ट्र न्यूज: ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. शहरातील राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळ्याव्याच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री मुश्रीफ बोलत होते. नगरविकास राज्यमंत्री...

नगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार :प्रेमासाठी त्यांनी उच्चल विचित्र प्रकार

माय महाराष्ट्र न्यूज :प्रेम आंधळं असतं, म्हटलं जातं. मात्र प्रेमात किती आंधळं व्हायचं, हेच काहींना समजत नाही. लोणीचा असाच एक आंधळा प्रेमी अहमदनगरमध्ये एका...

मोठी घडामोडी:राज्यपाल दोन दिवस नगर दौऱ्यावर; विखें पाटलांकडे मुक्काम

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी २७ व २८ ऑक्टोबर असे दोन दिवस नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत राहुरीच्या महात्मा फुले कृषी...
error: Content is protected !!