Monday, January 17, 2022

श्रीरामपूर जिल्हा करा;अन्यथा तीव्र आंदोलन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:श्रीरामपुरातील आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा निर्णय घेऊ नये, श्रीरामपूरच जिल्हा करावा तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असणारा आकारी पडित जमिनीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या मागणीसाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्रीरामपुरातील समर्थक व शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

विखे समर्थक माजी आ. भाऊसाहेब कांबळे, माजी सभापती दीपक पटारे, नाना शिंदे, गिरीधर आसने, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन बडधे, युवा सेनेचे निखील पवार आदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी केली.

श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय व्हावे म्हणून गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे 30 वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः नगर जिल्हा विभाजनाची घोषणा सोनई येथील सभेत करत नवीन मुख्यालयाचे ठिकाण श्रीरामपूर राहील, असे जाहीर केले होते. मात्र त्यानंतर बरेच पाणी वाहिले.

नंतर संगमनेरचे नाव पुढे करण्यात आले. श्रीरामपूर की संगमनेर? या वादात 30 वर्षे निघून गेली. मात्र जिल्ह्याचे विभाजनही झाले नाही आणि मुख्यालयाचा प्रश्नही तसाच भिजत पडला.श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी या ठिकाणी जिल्हा कोर्ट, आरटीओ कार्यालय, एमआयडीसी, मोठी प्रशासकीय इमारत,

जिल्हा उपग्रामीण रुग्णालय, एस. टी. कार्यशाळा यासह अनेक सरकारी कार्यालये कार्यान्वित आहेत. रेल्वेची सुविधा असणार्‍या श्रीरामपूर शहराच्या अगदी लगत शेती महामंडळाची शेकडो एकर जमीन जिल्हा वाढीसाठी तसेच सरकारी कार्यालये, निवासस्थानांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे श्रीरामपूरच जिल्ह्यासाठी

योग्य असे ठिकाण असल्याचे या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे विभाजन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शिष्टमंडळाने दिला.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!