Saturday, January 22, 2022

मोठी बातमी| आरोग्य विभागाची उद्या(शनिवारी) होणारी परीक्षा स्थगित

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील आरोग्य विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. आरोग्य विभागाच्या शनिवारी (उद्या) होणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ऐनवेळी आलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचाही मोठा गोंधळ उडाला आहे.

आरोग्य क आणि ड विभागासाठी घेण्यात येणाऱ्या उद्याच्या परीक्षा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 6205 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे.

क आणि ड आरोग्य विभागाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार य़ाबाबत सध्या कोणतीही माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलेली नाही. फक्त आरोग्य विभागाची उद्या होणारी परीक्षा रद्द झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्य विभागाच्या सावळ्यागोंधळामुळं परीक्षा रद्द करण्याची नामुष्की आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आरोग्य विभागाच्या क गटातील 2739 आणि ड गटातील 3466 जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. त्यासाठीची लेखी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबरला घेण्यात येणार होती.

राज्यातील 1500 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र ही परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ सप्टेंबर २०२१ रोजी आणि गट ड संवर्गातील

पदासाठी २६ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती. या परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा टोपे यांनी आढावा घेतला होता.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!