Tuesday, January 18, 2022

SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; लगेच उरकून घ्या हे काम, अन्यथा…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:भारतातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. एसबीआय बँकेच्या ग्राहकांनी त्यांचे पॅन कार्ड आधारशी लिंक करून घ्यावे, असे बँकेतर्फे कळविण्यात आलं आहे.

जर एसबीआयच्या ग्राहकांनी हे काम निर्धारित वेळेत केलं नाही, तर त्यांना बँकिंग सेवा मिळणे कठीण होईल, असेही बँकेने म्हटले आहे.केंद्र सरकारने पॅन कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. सध्या पॅन-आधार लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबर ते ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत एसबीआयने आपल्या ग्राहकांना शक्य तितक्या लवकर पॅनकार्ड आधारशी जोडण्याचे आवाहन केलं आहे.सर्वप्रथम, आयकर संकेतस्थळाच्या मदतीने, तुमचे पॅन आधारशी जोडलेले आहे की नाही, ते शोधा.

– यासाठी आधी आयकर संकेतस्थळावर जा.
– आधार कार्डवर प्रविष्ट केल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक प्रविष्ट करा.
– आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल, तरच स्क्वेअरवर टिक करा. त्यानंतर कॅप्चा कोड टाका.

– यानंतर लिंक आधारवर क्लिक करा. तुमचे पॅन आधारशी जोडले जाईल.एसएमएसद्वारे पॅनला आधारशी लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, १२-अंकी आधार क्रमांक आणि १०-अंकी पॅन क्रमांक प्रविष्ट करा. आता हा मेसेज ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा. तुमचे पॅन आधारशी जोडले जाईल.

निष्क्रिय पॅन कार्ड असे करा चालू
निष्क्रिय पॅन कार्ड पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला एक संदेश पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमच्या नोंदणीकृत मोबाईलमधून १२ अंकी पॅन टाकावा लागेल. नंतर स्पेस देऊन १० अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा संदेश ५६७६७८ किंवा ५६१६१ वर पाठवा.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!