Monday, January 17, 2022

आ.रोहित पवारांचा सरकारला घरचा आहेर म्हणाले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आरोग्य विभागाच्या शनिवारी आणि रविवारी होणारी परीक्षा रद्द करत सरकारने ऐनवेळी पुढे ढकळल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे तर विरोधी पक्षांनी सरकारवर टीका करत धारेवर धरले आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.रोहित पवार यांनी सरकारवर नाराजी व्यक्त करत, मग आधीच्या आणि आपल्या सरकार मधे काय फरक राहिला, असे म्हणत घरचा आहेर दिला आहे. याबाबत रोहित पवार यांनी सलग तीन ट्विट करत सरकारला जाब विचारत काही मागण्या केल्या आहेत.

राज्यभरात आज शनिवारी आणि उद्या रविवारी क आणि ड वर्गातील जवळपास ६,२०५ जागांसाठी परीक्षेचे नियोजन न्यासा या खाजगी संस्थेला दिले होते. या दृष्टीने भरती प्रक्रियेत सहभागी जवळपास आठ लाख परीक्षार्थींना हॉल तिकिटे वितरित झाली होती.

असे असताना अनेक परीक्षार्थीं परिक्षाकेंद्रावर पोहचत असताना, न्यासा संस्थेने ऐनवेळी परीक्षा प्रक्रिया पार पाडण्यास नियोजन करण्यासाठी अजून वेळ मागितल्याने सरकारने काल ऐनवेळी परीक्षा पुढे ढकलत असल्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक परीक्षार्थी वेगवेगळ्या शहरात पोहचले असताना

त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत मानसिक संताप झाला. या पार्श्वभूमीवर राज्यभर सरकारवर टीकेची झोड सर्व स्थरातून होत आहे.या पार्श्वभूमीवर सरकारमधील एका पक्षाचे आमदार असलेले आ.रोहित पवार यांनी ट्विट करून झालेल्या गोंधळाची आणि विद्यार्थ्यांना नाहक झालेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने राज्यातील आरोग्य व्यवस्था ही अगोदरच खिळखिळी झाली आहे. आपल्या सरकारने प्रक्रिया सुरू केलीय पण गोंधळाचे वातावरण दिसतेय, मग आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहिला?, असा प्रश्न आ.पवार यांनी उपस्थित केला आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!