Tuesday, November 30, 2021

नगर ब्रेकींग:बंधाऱ्यात प्रवरा नदीत पडून एकाचा मृत्यू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातीलयेथील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील एका इसमाचा मृत्यू झाला असुन या घटनेमुळे बंधाऱ्याच्या कठड्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे प्रवरा नदीवर वळदगाव बंधाऱ्याचे कठडे अज्ञात इसमांनी चोरुन नेल्यामुळे

बंधाऱ्यावरुन प्रवास करणे धोक्याचे झाले होते या बाबत ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणीही केली होती काही नागरीक या बंधाऱ्यावर पडून जखमीही झाले होते. अखेर या बंधाऱ्याने चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे हे सायकल वरुन बंधारा पार करत

असताना तोल जावून खाली पडले त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांचे निधन झाले .मयत रंगनाथ वायदंडे हे सायकल वरुन बेलापुरकडे येत होते अचानक त्यांचा तोल जावुन ते खाली फळ्या टाकण्याच्या कठड्यावर

 पडले त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर ईजा झाली होती .आसपासच्या नागरीकांनी त्यांना तातडीने बाहेर काढले त्यांना तातडीने प्रवरा मेडीकल हाँस्पीटल येथे दाखल करण्यात आले परंतु डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांना शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचार सुरु असतानाच

 त्यांची प्राणज्योत मालवली .या बंधाऱ्याचे कठडे तातडीने बसविले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा विक्रम नाईक यांनी दिला आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!