Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यात मोठी घटना:चालत्या एसटीचे चाक निखळले;६१ प्रवाशी यात मात्र

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शनिवार दि. 25 रोजी नगर कडून धुळ्याकडे एसटी बस क्रमांक एमएच 11 बीएल 9238 ही नगर-मनमाड रोड ने राहुरीपासून राहुरी फॅक्टरीच्या दिशेने सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान जात असताना सुतगिरणीच्या जवळ

नगर मनमाड रोडवर या एसटी बसचे ड्रायव्हर सीटखाली असलेले चाक अचानकपणे निखळले त्यामुळे ही बस जवळपास शंभर फूट चाक निखळलेल्या अवस्थेमध्ये घसरत गेली. अचानकपणे आवाज झाल्याने बसमध्ये असलेले 61 प्रवासी बस थांबताच या वाहनातून घाईघाईने खाली उतरले. या वाहनावरील

 चालक हा अनुभवी असल्याने खरं तर हा होणारा मोठा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे टळला. मात्र, ही सर्व बाब लक्षात आल्यानंतर सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. आपण वाहन चालकाच्या सतर्कतेमुळे बालंबाल बचावले आहोत, हे लक्षात आल्याने सर्व प्रवाशांनी या वाहनचालकाचे आभार मानले.

नगर-मनमाड रोडवर झालेले जीवघेणे खड्डे या अपघातास जबाबदार असल्याचे सांगत या प्रवाशांनी संबंधित अधिकारी व प्रशासनाप्रती आपला संताप व्यक्त केला. नगर-मनमाड रोडवर अपघात होणे नित्याचेच झाले आहे. दोन दिवसापूर्वी राहुरी येथे दोनजणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर राहुरी फॅक्टरी येथील

नागरिकाने याच दिवशी अपघातांमध्ये आपले प्राण गमावले आहेत. हे खड्डे आणखी किती जणांचे जीव घेणार? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.एसटी बसच्या झालेले अपघातामध्ये 61 जण बालंबाल बचावले. मात्र, या अपघाताने मोठे स्वरूप धारण केले असते तर अनेकांचे संसार यामध्ये उद्ध्वस्त झाले असते.

आतातरी प्रशासनाचे डोळे उघडतील काय? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!