Friday, December 3, 2021

किसान सभा-काँग्रेसचा भेंड्यात रास्तारोको

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अखिल भारतीय किसान सभा व तालुका काँगेसच्या वतीने तालुक्यातील भेंडा येथे नेवासा-शेवगाव रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायद्या सह कामगार कायदा रद्द करावी अशी मागणी किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ.बाबा आरगडे यांनी केली.

सभेचे जेष्ठ नेते कॉ.बाबा आरगडे व काँग्रेस चे तालुका अध्यक्ष संभाजी माळवदे यांचे नेतृत्वाखाली सोमवार दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजता भेंडा येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.रास्तारोको पूर्वी बसस्थानका समोरील प्रांगणात आंदोलकांची भाषणे झाली.त्यानंतर नेवासा-शेवगाव रस्त्यावर येऊन आंदोलकांनी रस्ता अडवला.कॉ.बाबा आरगडे यांचे भाषणानंतर प्रशासनाला निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले.त्यामुळे सकाळी केवळ 11:30 ते 11:40 या वेळेत रास्तारोको झाला.
कॉ.बाबा आरगडे,संभाजी माळवदे,कॉ.अड.बंशी सातपुते,
यांनी भाषणे करून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली.

तीन काळे कृषी कायदे मागे घ्यावेत,शेती मालाला हमी भावाची तरतूद करावी,वीज बिल 2020 मागे घ्यावे,सुधारित कामगार कायदे मागे घ्यावेत,सार्वजनिक उद्योग विक्री-खाजगीकरण रद्द करावे या प्रमुख मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

आंदोलनात कॉ.आप्पासाहेब वाबळे,कॉ.भारत आरगडे,वसंतराव फटांगडे,रामभाऊ पाउलबुद्धे,कारभारी गरड,संजय फुलमाळी,खंडू पाटील,संजय होडगर,शोभा पातारे, मुरलीधर तागड,संदीप मोटे,सौरव कसावणे,बाबासाहेब जावळे,दत्ता गवारे,भास्कर खंडागळे,आदी सहभागी झाले होते.

नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांनी निवेदन स्वीकारले.उपनिरीक्षक समाधान भाटेवाल व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

 

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!