माय महाराष्ट्र न्यूज:कॉंग्रेसने आपल्या राजवटीत नागरिकांना कमी वीज दिली. वीज नीट पुरवता न आल्याने कॉंग्रेसच्या काळात लोकसंख्या वाढली, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी
यांनी कर्नाटकातील कॉंग्रेस राजवटीचे वर्णन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ते उत्तर कर्नाटकच्या हसन जिल्ह्यात नोलत होते.मात्र, या विधानावर कॉंग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
दुसरीकडे, प्रल्हाद जोशी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, हसन जिल्ह्यातील पक्ष संघटना आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कर्नाटकातील विजयाचा आमचा संकल्प खरोखरच दृढ करतो.
कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ मे महिन्यात संपणार आहे. अशा स्थितीत निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रल्हाद जोशी यांनी “विजया संकल्प यात्रे” अंतर्गत हसन जिल्ह्यातील जावागल येथे एका भव्य रोड शोमध्ये भाग घेतला, जेथे लोकांना संबोधित करताना त्यांची जीभ घसरली.
दरम्यान, कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी असा दावा केला आहे की, त्यांच्या पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत एकूण 224 जागांपैकी 140 पेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज
वर्तवण्यात आला आहे. भाजपचे दोन माजी आमदार आणि म्हैसूरचे माजी महापौर यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या तीन नेत्यांमध्ये
माजी कोल्लेगल आमदार जी एन नंजुनदास्वामी आणि विजापूरचे माजी आमदार मनोहर ऐनापूर यांच्यासह म्हैसूरचे माजी महापौर पुरुषोत्तम यांचा समावेश आहे.