Friday, December 3, 2021

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ताजोद्दिन शेख महाराजांचे किर्तन सुरू असतानाच निधन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले ताजुद्दीन बाबा यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. विशेष म्हणजे कीर्तन करतांना उभे असतानाच त्यांना हृदयविकाराचा  झटका आला आणि ते खाली बसले. त्यानंतर मांचावरच त्यांचे निधन झाले. ही घटना काल रात्री नंदुरबार येथे घडली.

ताजुद्दीन बाबा हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते. त्यांनी स्वतः विठ्ठल रुखमाई यांची देऊळ उभे केले होते.हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता.

त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनी मध्ये काम ही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला होता.नेहमी प्रमाणे ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन सुरू होते. त्यांच्या या कीर्तनाला नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.

त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते स्टेजवर खाली बसले. कीर्तन सुरू असताना काही जण आपल्या मोबाइलमध्ये हे शूट करत होते. त्याचवेळी ताजुद्दीन महाराजांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

महाराष्ट्रात कीर्तनाची एक मोठी परंपरा आहे. अनेक कीर्तनकारांप्रमाणेच ताजुद्दीन महाराज हे सुद्धा प्रसिद्ध होते. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असत. मुस्लीम असतानाही गीता, संत परंपरेबाबत त्यांना मोठे ज्ञान अवगत होते. गीता आणि कुराण या दोन्हीबाबत त्यांना चांगला अभ्यास होता.

ताजुद्दीन महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी तरुणांपासून ते वयोवृद्दांपर्यंत सर्वच जण उपस्थिती लावत असत. त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून नागरिक येत असतंय. त्याचप्रमाणे कीर्तनासाठी त्यांना देशभरातील विविध भागांतून आमंत्रितही करण्यात येत होते.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!