Tuesday, November 30, 2021

मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट आणणारेच आता कृषी कायद्यांना विरोध करतात याचे आश्चर्य वाटते. केवळ मोदी सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे. परंतु 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून बाजार समित्या अधिक सक्षम करण्याचे केंद्र सरकारचे धोरण स्पष्ट असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते  आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा सभापती भाऊसाहेब जेजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव सदाफळ, उपसभापती बाळासाहेब जपे,

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड. रघुनाथ बोठे, सहायक निबंधक रावसाहेब खेडकर, तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्यासह सर्व संचालक ऑनलाईन पध्दतीने या सभेत सहभागी झाले होते.

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना होत असलेल्या विरोधावर टीका करताना महाविकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. बाजार समित्या बंद होणार, कंत्राटी शेतीमुळे जमिनी बळकावल्या जाणार अशी दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

परंतु बाजार समित्यांसाठी मॉडेल अ‍ॅक्ट ज्यांनी आणला तेच आज कृषी कायद्यांच्या विरोधासाठी पुढे दिसतात याचे आश्चर्य वाटते. केंद्र सरकार देशातील शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेत असून ईनाम योजनेतून देशातील 1 हजार बाजार समित्या साखळी पध्दतीने जोडण्याचे धोरण आहे. यासाठी 1 लाख कोटी रुपयांची

तरतूद केंद्र सरकारने केली आहे. प्रचलित पणन व्यवस्थेला कुठेही धक्का न लावता शेतकर्‍यांच्या उत्पादीत मालाला अधिकचा भाव मिळवून देण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोविड संकटात राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीने सर्व नियमांचे पालन करून कामकाज सुरू ठेवल्याने शेतकरी

व्यापारी यांना दिलासा मिळाला. येणार्‍या काळात देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ शेतकर्‍यांना उपलब्ध करून देऊन नावलौकिक साध्य करण्याचे आवाहन आ. विखे यांनी केले.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!