Friday, December 3, 2021

दोन दिवसांनी या’ बँकेची ATM सेंटर्स होणार बंद

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पुढील महिन्यापासून अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टींमध्ये बदल होणार आहे.ऑक्टोबर महिना सुरू झाल्यानंतर तुमची बँक तसंच पगाराशी संबधित काही नियमात बदल होणार आहेत. तर बँकिंग नियमांपासून एलपीजी (एलपीजी किंमत) पर्यंत अनेक बदलांचा समावेश आहे.

दरम्यान. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 1 ऑक्टोबरपासून एटीएम सेवा बंद करणार आहे. बँकेने म्हटले आहे की, ग्राहकांना त्यांचे डेबिट कार्ड इतर बँकांच्या एटीएममध्ये वापरण्याचा पर्याय उपलब्ध राहील. तांत्रिक अडचणींमुळे बँकेने हा निर्णय घेतल्याचे समजते.

तुम्ही तुमच्या सूर्योदय बँकेच्या एटीएम / डेबिट कार्डचा वापर तुमच्या इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सुरू ठेवू शकता, असे बँकेने ग्राहकांना दिलेल्या संदेशात स्पष्ट केले आहे. 30 जूनपर्यंत, सूर्योदय एसएफबीकडे एकूण 555 बँकिंग आउटलेट होते, त्यापैकी 97 लायबिलिटी फोकस आउटलेट होते आणि 30 जून रोजी एकूण कर्मचारी संख्या 5,072 होती.

इतर बँकिंग सेवांसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर करू शकतात. पिन बनवणे, निधी हस्तांतरण, मिनी स्टेटमेंट, बॅलन्स तपासणे इत्यादी इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगद्वारे उपलब्ध होतील.

बँकेच्या एटीएम केंद्रांचा ग्राहकांकडून म्हणावा तसा वापर होताना दिसत नव्हता. त्यामुळे एटीएम केंद्रे सुरु ठेवणे फारसे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे आम्ही बँकेची एटीएम केंद्रे बंद करुन त्याऐवजी ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएम केंद्रांवर मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक

आर.भास्कर बाबू यांनी सांगितले. अलीकडच्या काळात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने रोख पैसे काढण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे बँकेने एटीएम केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे आर.भास्कर बाबू यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!