Tuesday, November 30, 2021

नगर जिल्ह्यातील शेतमालाच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:- खरीप पणन हंगाम 2021-22 मध्ये शासनाची आधारभुत किंमत खरेदी योजना अंतर्गत शेतमाल मका, बाजरी व ज्वारी  या शेतमालाची हमीभाव योजनेमध्ये शेतकरी नोंदणी करण्याकरीता मार्केटींग फेडरेशन मार्फत सब एजेंट संस्था नियुक्त करुन राबवीली जात आहे.

त्याकरीता शासनाच्या  ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरीता दिनांक 3 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यत मका, बाजरी व ज्वारी या शेतमालाची नोंदणी प्रक्रिया जिल्हयातील  राहुरी, श्रीगोंदा, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, कर्जत, खर्डा- जामखेड या आठ तालुक्यांमध्ये खरेदी केंद्रावर शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे.

शेतमाल नोंदणी करीता शेतक-यांचे 8 अ, शेतकरी 7/12 उतारा(तलाठी पिक पेरा नोंद प्रमाणपत्र आवश्यक आहे.), चालु हंगामातील शेतमालाची ऑनलाईन पीक पेरा नोंदणी असावी. शेतकरी आधारकार्ड छायांकीत प्रत. बँक खाते पासबुक छायांकीत प्रत (शक्यतो कॅन्सल केलेला चेक किंवा बँक

खातेबाबत पुर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट) बँक खाते हे जनधन नसावे तसेच बंद झालेले बँक खाते नसावे. अन्यथा खरेदी झालेल्या मालाची रक्कम बँक खाती जमा होत नाही. याची नोंद शेतक-यांनी घ्यावी. तरी जिल्हयातील शेतक-यांनी या योजनेचा जास्तीत

जास्त लाभ घ्यावा असे आवाहन हनुमंत पवार, जिल्हा मार्केटींग अधिकारी, अहमदनगर यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!