Friday, December 3, 2021

नगरमध्ये जयंत पाटलांचे मोठे विधान:हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :मंत्री जयंत पाटील दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नगरला आले आहेत. सकाळी जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पक्षाच्या परिवार संवाद यात्रेचा भाग म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत.

या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर लावले गेलेले आरोप खोटे असल्याचेही त्यांनी सांगितले.महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाला बदनाम करण्यासाठी इडी, सीबीआय व आयटी यंत्रणांना हाताशी धरून भाजप कारवाई करण्यास सांगत आहे.

याचवेळी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांच्या गैरकारभाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. असं असेल तर आम्हीही अशा नेत्यांच्या आणि त्यांच्या गुन्ह्यांची माहिती देऊ, त्यांच्यावर या यंत्रणांनी कारवाई करून दाखवावी,’ असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं.

ते म्हणाले, ‘हे सर्व जाणीवपूर्वक सुरू आहे. यासंबंधी एक हिंदी भाषेतील संभाषण असलेली ऑडिओ क्लीप व्हायरल झाली होती. त्या क्लीपमध्ये बोलणाऱ्यांनी राज्यातील मंत्रिमंडळ अस्थिर करण्यासाठी डाव आखल्याचं स्पष्ट होतं. तेव्हापासून हे प्रकार वाढले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना

तसेच भाजप सोडून गेलेल्या नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं उदाहरण घेतलं तर ज्या भोसरीतील जागेसंबंधी आरोप आहे. त्या जागेची खरेदी त्यांच्या जावयाकडून रितसर झाल्याचं दिसून येत आहे. जी जागा एमआयडीसीने ताब्यातच घेतली नव्हती. ती मूळ मालकानं

खडसे यांच्या जावयाला विकली आहे. त्यांनीही बँकेचे कर्ज काढून ती घेतली. कर्जाची परतफेडही हप्ताने केली आहे. त्यामुळं येथे काळ्या पैशाचा संबंध येतोच कुठं, असं असूनही खडसे यांच्यावर त्यासंबंधीचे आरोप करण्यात येत आहेत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!