Tuesday, November 30, 2021

मुळा उजवा कालवा वितरका दुरुस्तीसाठी 10 कोटींचा निधी द्या-मा.आ.घुले

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2 ,टेल डीवाय व पाथर्डी ब्रँच दुरुस्ती साठी 10 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचे कडे केली आहे.

राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंतराव पाटील यांचे अध्यक्षतेखाली आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची आढावा बैठक संपन्न झाली.त्यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतककऱ्यांचे शिष्टमंडळाने ना.पाटील यांची भेट घेऊन मुळा उजवा कालवा वितरका नूतनीकरण करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली.

*मा.आ.नरेंद्र घुले पाटील…*

यावेळी बोलताना माजी आ. घुले पाटील म्हणाले,जायकवाडी धरण होतांना धरणासाठी जमिनी गेल्या त्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना आणि पूर्वसन करण्यासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांना मुळा धरणाचे 12 माही पाणी देण्याचे सरकारने आश्वासित केले होते.मात्र प्रत्यक्षात कोणालाच पाणी मिळत नाही.मागील वर्षी मुळा धरण 100 टक्के भरून सुद्धा टेलच्या भागात पाणी पोहचले नाही.त्यामुळे नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील लाभक्षेत्रात टेलच्या भागापर्यंत पूर्ण दाबाने पाणी मिळावे यासाठी मुळा उजवा कालव्यावरील ब्रँच-2 चे नूतनीकरणासाठी 4 कोटी 97 लाख ,टेल डीवायच्या नूतनीकरणासाठी 1 कोटी 60 लाख रुपये व पाथर्डी ब्रँचच्या नुतनीकरणासाठी 3 कोटी 36 लाख असा 9 कोटी 97 लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी केली.
तसेच नेवासा तालुक्यात असणार कौठा या गावात मुळा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते याबाबत तोडगा काढण्यासाठी सद्यप्रश्नांकडे श्री.घुले यांनी मंत्री महोदय आणि उपस्थित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

यावेळी जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटिल यांनी मा.आ. नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांचे मुद्दे गांभीर्याने घेत या प्रश्नांवर तात्काळ मार्ग काढण्याच्या सुचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये येणाऱ्या अडचणीही दूर केल्या जातील असे आश्वासन देऊन या कामासाठी तातडीने निधी देण्याचे ही आश्वासन दिले.

या बैठकीला माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील,आ.लहु कानडे,आ.संग्रामभैय्या जगताप,आ.डॉ.किरण लहामटे,माजी आ.पांडुरंग अभंग,शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील,काकासाहेब नरवडे,संजय कोळगे,काशिनाथ नवले,निवृत्ती दातीर यांचेसह जिल्हाधिकारी

डॉ.राजेंद्र भोसले, जलसंपदाचे उत्तर महाराष्ट्र विभागाचे मुख्य अभियंता डॉ.संजय बेलसरेविशेष प्रक्पल्पपुण्याचे मुख्य अभियंता एस.टी.धुमाळअहमदनगरचे अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे प्रशासक अ.रा.नाईकनाशिकच्या अधिक्षक अभियंता व लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासक श्रीमती अलका अहिररावअहमदनगर मध्यम प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता का.ल.मासाळअहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जी.बी.नान्नेारमुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती सायली पाटीलकुकडी कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील शिंदेलघु पाटबंधारे क्रमांक दोन विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती संगिता जगतापसंगमनेर येथील उर्ध्व प्रवरा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.लव्हाटसंगमनेर येथील उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.माने उपस्थित होते. 

 

 

 

व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना:पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे.पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30...

नगर जिल्ह्यातील अतिशय दुर्देवी घटना: दोघा सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे जलाशयावर आंघोळीसाठी गेलेल्या राजूर येथील दोन भावंडांचा रविवारी (२८ नोव्हेंबर) सायंकाळी पाण्याच्या भोवर्‍यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याने राजूर...

भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांना पोलिसांनी केली अटक

माय महाराष्ट्र न्यूज:कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या...

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या या आमदारांंच्या अडचणीत वाढ होणार ?

माय महाराष्ट्र न्यूज:नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मतदारांची दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करीत येथील निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप अशोक...

महाराष्ट्रात पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी

माय महाराष्ट्र न्यूज: येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत....

राऊतांच्या मुलींच्या लग्नात सुप्रिया सुळे व संजय राऊतांचा डान्स, विखे-पाटील म्हणतात….

माय महाराष्ट्र न्यूज:संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत उद्या (सोमवार 29 नोव्हेंबर रोजी) विवाहबंधनात अडकणार आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी...
error: Content is protected !!