Saturday, November 27, 2021

नगर ब्रेकींग:त्या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी सासरच्या लोकांवर खुनाचा गुन्हा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नेवासा तालुक्यातील खरवंडीचे सोपान भोगे यांची मुलगी कोमल हिचा विवाह नगर तालुक्यातील शिंगवे नाईक येथील रमेश बाळासाहेब जाधव याच्यासोबत झाला होता. पती रमेश, सासरा बाळासाहेब जाधव व सासू सुनीता जाधव

 यांनी पैशासाठी छळ केल्याने कोमलने आत्महत्या केल्याप्रकरणी सुरूवातीला पती, सासू सासऱ्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.दोन दिवसांपूर्वी मयत कोमलचे वडिल सोपान भोगे, भाऊ अरूण भोगे, प्रभाकर भोगे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट

घेत सासरच्या लोकांनी पैशासाठी छळ करून कोमलला मारहाण केली व विहिरीत टाकून दिले, असा आरोप केला होता. तसे निवेदन अधीक्षक पाटील यांना दिले होते. अधीक्षक पाटील यांनी तात्काळ दखल घेत पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस उपअधीक्षक अजित पाटील व सहायक निरीक्षक आठरे यांना दिले होते.

त्यानुसार रमेश जाधव, बाळासाहेब जाधव व सुनीता जाधव यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान पोलिसांनी रमेश जाधव याला अटक केली असून अद्याप सासरा बाळासाहेब व सासू सुनीता यांना अटक केलेली नाही. त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भोगे कुटुंबाने केली आहे

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!