Saturday, November 27, 2021

आजपासून बदलणार हे नियम, वाचा सामान्यांना झटका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शुक्रवारपासून (1 ऑक्टोबर) बँकिंग, पेन्शन तसेच इतर काही महत्त्वाच्या नियमांत बदल होत आहेत. ऑटो डेबिट पेमेंटसाठी ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीमशी संबंधित नियमांत बदल आजपासून लागू होणार आहेत. यांतर्गत बँका आणि पेटीएम,

फोन पेसारख्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मअंतर्गत हप्ते अथवा कोणत्याही प्रकारचे बिल पेमेंट खात्यातून वजा करण्यापूर्वी प्रत्येकवेळी ग्राहकाची परवानगी घ्यावी लागणार आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुमचा सक्रिय मोबाईल क्रमांक बँकेत अपडेट असणे आवश्यक आहे.

5,000 पेक्षा जास्त पेमेंटसाठी ओटीपी प्रणाली अनिवार्य केली आहे. हा बदल फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्ड किंवा त्यांच्यावर सेट केलेल्या ऑटो डेबिट पेमेंट मोडवर लागू होईल.जर तुम्ही घर, वाहन किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल, तर ही नवीन प्रणाली त्याच्या हप्त्यावर लागू होणार नाही.

कारण, ते तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे. त्याचप्रमाणे जर तुम्ही एलआयसी किंवा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक केली असेल व ती तुमच्या बँक खात्याशी जोडलेली असेल, तर ही नवीन प्रणाली यावरदेखील लागू होणार नाही.

तीन बँकांचे चेकबुक आऊटडेटेड होणार
विलीनीकरणामुळे 1 ऑक्टोबरपासून अलाहाबाद बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांचे जुने चेकबुक आऊटडेटेड होणार आहे. तिन्ही बँकांचा एमआयसीआर कोड हा आजपासून ग्राह्य धरला जाणार नाही. दरम्यान, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आजपासून आपली एटीएम सेवा बंद करीत आहे.

पेन्शनसंदर्भात हा बदल
पेन्शनशी निगडित डिजिटल लाईफ सर्टिफिकेटच्या नियमातील बदलही आजपासून लागू होत आहेत. त्यानुसार आता 80 वर्षांवरील पेन्शनधारक ते हयातीत असल्याचे प्रमाणपत्र पोस्टाच्या मुख्य कार्यालयात असलेल्या जीवन प्रमाण केंद्राकडे सादर करू शकणार आहेत. 30 नोव्हेंबरपर्यंत हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

पोस्टाच्या एटीएम शुल्कावर जीएसटी
पोस्टाच्या ग्राहकांना आता त्यांनी घेतलेल्या एटीएमच्या मेंटेनन्स शुल्कापोटी 125 अधिक जीएसटी द्यावा लागेल. याशिवाय एसएमएस अ‍ॅलर्ट सेवेसाठी 12 रुपये आकारले जाणार आहेत. कार्ड गहाळ झाल्यास 1 ऑक्टोबरपासून 300 रुपये

भरल्यानंतर नवे कार्ड मिळेल. पुरेशा रकमेअभावी पीओएस व्यवहार रद्द झाल्यास 20 रुपये दंड अधिक जीएसटी तसेच पाच मोफत एटीएम व्यवहारांनंतर पुढील व्यवहारासाठी प्रत्येकी 10 रुपये अधिक जीएसटी अदा करावा लागणार आहे. नवीन पिन क्रमांक जारी करण्यासाठी 50 रुपये अधिक जीएसटी असे शुल्क आकारले जाणार आहे.

ताज्या बातम्या

नगर जिल्ह्यात एकच खळबळ:काटवनात आढळला तरुणाचा मृतदेह, घातपात की आत्महत्या

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील तळेगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या साठवण तलावानजीक रस्त्याच्याकडेच्या काटवनात तळेगाव दिघे (वामनवाडी) येथील तरुणाचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी...

बापरे : पती-पत्नी मिळून चालवायचे देह विक्रीचा व्यवसाय

माय महाराष्ट्र न्यूज: पोलिसांनी मानवी तस्करीचा भांडाफोड केला आहे. हे तस्कर बांग्लादेशातून तरुणी आणून भारतात देह व्यापाराच्या व्यवसायाता ढकलत होते. पोलिसांनी टोळीच्या प्रमुखासह 8...

मोठी बातमी:महाराष्ट्रात सरकार पाडण्याच्या हालचाली?आज अमित शहा, देवेंद्र फडणवीस व शरद पवार दिल्लीत भेट ?

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपचे सरकार येणार असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यातच महाराष्ट्रातील अनेक नेते...

धक्कादायक :महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नावे सोशल मीडियावर बनावट अकाउंट, अश्लील Video केला शेअर

माय महाराष्ट्र न्यूज: पुणे शहर पोलीस विभागातील एका महिला कर्मचार्‍याच्या नावाने फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून त्यावर अश्लील व्हिडिओ...

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर चिंताजनक

माय महाराष्ट्र न्यूज: राज्यामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे आहेत. तिसरी लाट जरी आली तरी अतिशय सौम्य प्रमाणात असल्याचा दावा राज्याचे...

नगर जिल्हा रुग्णालय :१४ जणांचा बळी घेणारी आग कशी लागली? अहवाल तयार

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या कोविड अतिदक्षता विभागात ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीचा अहवाल राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने तयार केला आहे. सुमारे ६५...
error: Content is protected !!