Monday, October 18, 2021

महाराष्ट्र ब्रेकींग:या महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन शिवीगाळ अन् धमकी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: भाजप आमदार नमिता मुंदडा  यांचे पती अक्षय मुंदडा  यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.अक्षय मुंदडा यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी ऋषिकेश अण्णासाहेब लोमटे रा. अंबाजोगाई यांचा फोन आला.

त्याने फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी संभाषण रेकॉर्ड करून घेतले. तर याप्रकरणी अक्षय मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 500, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

अक्षय मुंदडा हे माजी मंत्री स्व. विमलताई मुंदडा यांचे चिरंजीव आहेत. तसेच ते भाजपच्या केज मतदार संघातील विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांचे पती आहेत. देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. सुरुवातीला ऋषिकेश

लोमटे यांनी कॉलवरून विनंती करत रस्त्याचे काम सुरू करू देण्याची मागणी केली. तुमच्या हाताने उद्घाटन करू काम करू द्या असं लोमटे हे सांगत असल्याचं व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे.

विनंती करूनही आमदार पतीने ऐकल्यामुळे ऋषिकेश लोमटे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शिवीगाळ करायला सुरुवात केली. तसेच इकडे आला तर जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची कॉल रेकॉर्डिंग सोशल माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर आमदार पती यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

खळबळजनक:नगर जिल्ह्यातील एक मोठा मंत्री भ्रष्टाचारात अडकला ?

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त 60 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत वृद्ध रुग्णांची आरोग्य तपासणी...

नगर ब्रेकींग:बॅंकेसमोर भरदिवसा डोक्‍यात दगड घालून तरुणाचा खून

माय महाराष्ट्र न्यूज:लहान मुलांमध्ये सायकल लावण्यावरून झालेल्या भांडणाचे पर्यावसन दोन्ही कुटुंबात झाले. या वादातून भांड्याचे व्यापारी जावेद गणीभाई तांबोळी (वय 38) यांचा भरदिवसा डोक्‍यात...

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेवरुन एकच गोंधळ उडाला आहे. परीक्षेत झालेल्या गोंधळाची ही दुसरी वेळ असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजप आमदार अतुल...

सरकारकडून बेरोजगारांना मिळणार दरमहा 3500 रुपयांची आर्थिक मदत?वाचा सत्य

माय महाराष्ट्र न्यूज:एकीकडे सोशल मीडिया कोणतीही बातमी किंवा माहिती पटकन पसरवण्यास मदत करत आहे, तर दुसरीकडे फेक बातम्या पसरवण्यातही तो अव्वल आहे. आजकाल सोशल...

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला अटक

माय महाराष्ट्र न्यूज:टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे...

रोहित पवारांची चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपावर खोचक टीका

माय महाराष्ट्र न्यूज:भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचं समोर...
error: Content is protected !!